अमरावतीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 2 मध्ये ड्युटीवर असताना रुग्णालयातील एका नर्सवर महिला रुग्णाने किरकोळ वादानंतर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला आहे. लता शिरसाट असे या जखमी नर्सचे नाव आहे. तिच्या नाकाला आणि जबड्याला दुखापत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्ण महिला मानसिक दृष्टया आजारी असून तिचा ड्युटीवर असलेल्या स्टाफ नर्सशी किरकोळ वाद झाला आणि महिलेने जवळ पडलेले धारदार शस्त्र उचलून नर्सवर हल्ला केला
.या हल्ल्यात नर्सच्या नाकाला आणि जबड्याला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळतातच सिटी कोतवाली पोलिसांनी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तिला ताब्यात घेतले आहे. महिलेला मानसिक दृष्टया आजारी असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळच्या बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.