Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात आरक्षणासाठी धनगर जमातीचे आंदोलन शेळ्या-मेंढ्या घेऊन आंदोलक रस्त्यावर

महाराष्ट्रात आरक्षणासाठी धनगर जमातीचे आंदोलन शेळ्या-मेंढ्या घेऊन आंदोलक रस्त्यावर
, मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 (09:56 IST)
मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरूच आहे आता धनगर समाज देखील आरक्षणाची मागणी घेऊन रस्त्यावर उतरले आहे. अकोल्यात धनगर समाज प्रवर्गात आरक्षणाची मागणी करत शेळ्या मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरले. 
सोमवारी त्यांनी मुंबई ते कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अनेक तास रोखला.

राज्यात पंढरपूर, नेवासा, लातूर येथे धनगर समाजाचे लोक उपोषणाला बसले असून आरक्षणाची मागणी करत आंदोलन सुरु केले आहे. आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी आणि अनुसूचित जमातींमधून आरक्षण मिळावे या साठी आता धनगर समाज लढत आहे. त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.सोमवारी बीड जिल्ह्यात अंबाजोगाई, केज, परळी मध्ये रस्ता रोको आंदोलन केले. 

बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण दिले पण आम्हाला या आरक्षणापासून दूर ठेवले असे धनगर समाज म्हणत आहे. या आरक्षणाची मागणी करत धनगर समाज रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहे. 

आंदोलनाची माहिती मिळाल्यावर पोलीस आले आणि त्यांनी आंदोलकांना पांगवून वाहतूक सुरु केली.  
धनगर समाजाच्या लोकांनी रस्त्यावर शेळ्या मेंढ्या घेऊन रस्त्यावर आंदोलन सुरु केले. आणि सरकारचा निषेध केला. या आंदोलनाचे पडसाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात देखील दिसले. बारामती इंदापूर रस्त्यावरील काटेवाडी येथे धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या वेळी रस्त्यावर वाहनांची मोठी रांग दिसत होती. राज्यात धनगड जमात अस्तित्वात नसून धनगर असल्याचे शपथपत्र राज्य सरकार ने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. त्या अनुषंगाने सरकार ने आरक्षणाचा अध्यादेश  काढावा  छत्रपती संभाजी नगर येथे काही धनगर बांधवांनी धनगड जातीचे बनावट दाखले काढले आहे. ते बनावट दाखले रद्द करण्यात यावे.आणि अनुसूचित जमातीच्या यादीत 36 क्रमांकाला असलेल्या धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती करुन अनुसूचित जमातीचे दाखले वितरीत करण्याची मागणी धनगर समाजाचे आंदोलक करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बदलापूर बलात्काराच्या आरोपीचा एन्काउंटर करणारे संजय शिंदे कोण?