rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजू शेट्टींची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Raju Shetty's complaint to EC
हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीच्यावेळी 459 मते जास्त निघाल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. त्‍यांच्‍या या आरोपानंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी राजू शेट्टींनी  निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. 
 
याची माहिती देताना राजू शेट्टी म्‍हणाले की, 'हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएमद्वारे एकूण 12 लाख 45 हजार 797 मतदान झाले होते. मात्र, मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये 12 लाख 46 हजार 256 मते मोजली गेली. याप्रमाणे झालेल्या मतदानापेक्षा एकूण 459 मते जादा झाली आहेत.' यामध्ये पोस्टलची मते धरलेली नसल्याचेही राजू शेट्टी यांनी नमूद केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आणि संजय राऊतांनी केली सारवासारव