Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय राऊत यांना हटवा - भिडे

संजय राऊत यांना हटवा - भिडे
, शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (16:42 IST)
शिवसेना देशभरात वाढावी अशी माझी  इच्छा आहे, कारण अन्न, पाणी, वाऱ्याइतकीच शिवसेनेची देशाला आवश्यकता आहे. मात्र त्यासाठी संजय राऊत यांना पदावरुन हटवा, अशी हात जोडून विनंती ‘शिवप्रतिष्ठान’चे नेते संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे (Sambhaji Bhide appeals Uddhav Thackeray) केली. संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भिडेंनी ‘सांगली बंद’पुकारला आहे
 
‘शिवसेना याचा अर्थ छत्रपती परंपरेचा चालू असलेला जो श्वासोच्छ्वास आहे, ते लक्षात घेऊन शिवसेनाप्रमुखांना मी एकच विनंती करेन, की त्यांनी आवरावं. शिवसेनेला ज्याच्यामुळे बदनाम होण्याची वेळ येईल, अशी विधानं करणारे राऊत, त्यांना स्थानावरुन मोकळं करावं, अशी इच्छा आहे’ असं संभाजी भिडे सांगलीत म्हणाले आहेत. 
 
‘शिवसेना ही सबंध देशात गेली पाहिजे, देशभरात वाढली पाहिजे, अत्यंत आवश्यक आहे. हिंदुस्थानला राष्ट्र म्हणून टिकायचं असेल, हिंदूराष्ट्र म्हणून टिकायचं असेल, तर शिवसेना ही अत्यंत अत्यंत अत्यंत, हो… अन्न, पाणी, वायू, सूर्यप्रकाश हे जीवन जगण्यासाठी लागतो. तशी शिवसेना आहे. तर माझी कळकळीची प्रार्थना आहे, उद्धवरावांना, संजय राऊतांना बाजूला करावं. शिवसेनेविषयी लोकांचं मत बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी’ असं आवाहनही संभाजी भिडेंनी केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट