Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साईचरणी ९ दिवसात तब्बल ९कोटी ८४ लाखांचे दान जमा

saibaba
, मंगळवार, 3 जानेवारी 2017 (16:06 IST)
नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाच्या निमित्ताने  गेल्या नऊ दिवसांत जवळपास १० लाख भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं. यातून  ९ दिवसात तब्बल ९कोटी ८४ लाख रुपयांचे  दान जमा झाले  आहे. यामध्ये दानपेटी, ऑनलाईन, देणगी काऊंटरवर, मनीऑर्डर आणि सशुल्क दर्शनाच्या माध्यमातून हे कोट्यवधींचं दान जमा झाले . दानपेटीत तब्बल ५कोटी ३५ लाख जमा झाले असून देणगी कांऊटरवर १ कोटी ४५ लाखाचे दान अर्पण केले. तसेच ऑनलाईन आणि डेबिट कार्डद्वारे तब्बल ३४ लाखाचे दान देण्यात आले.  यासोबतच मनीऑर्डर आणि चेकच्या माध्यमातून ६७  लाखाचे दान जमा झाले. तर सशुल्क दर्शनाच्या माध्यमातून १कोटी २३ लाख रुपये साई संस्थानाला मिळाले आहेत. पैशांसोबतच ७४  लाखाचं सोनं आणि चांदीही साईंना अर्पण करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर्व्हिस चार्ज द्या, नाही तर हॉटेलमध्ये जेवू नका