Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

तलाठी भरती परीक्षेत घोटाळा! २०० पैकी २१४ गुण

exam
, सोमवार, 8 जानेवारी 2024 (09:19 IST)
तलाठी भरती परीक्षेचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. एका विद्यार्थ्याला २०० पैकी २१४ गुण मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आजपर्यंतच्या शैक्षणिक इतिहासातील हे एक आश्चर्य म्हणावे लागेल. तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ््याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
 
तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ््याची एसआयटी चौकशी व्हावी, ही आमची मागणी आहे. २०० पैकी २१४ गुण एका उमेदवाराला मिळत असतील तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करते आणि सत्ताधा-यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवला, हे आता स्पष्ट होत आहे. तलाठी भरती परीक्षेतील घोटाळ््यावरून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी या भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज सरकारला स्पर्धा परीक्षा करणा-या विद्यार्थ्यांनी सत्तेतून खाली खेचण्याची गरज असल्याचे म्हटले. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेल्या ट्वीटद्वारे ही माहिती समोर आली आहे. एकाच विद्यार्थ्याला वनरक्षक परीक्षेत चोपन्न गुण मिळाले तर तलाठी भरती परीक्षेत दोनशेपैकी दोनशे चौदा गुण मिळाले आहेत. ही गंभीर बाब असल्याचे म्हटले.
 
गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असोत, की सरळ सेवा भरतीच्या परीक्षा असोत. या परीक्षांतील पारदर्शकता पूर्णपणे संपली असून, अहोरात्र मेहनत करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम शिंदे-फडणवीस-पवार सरकार करीत आहे, असा आरोप केला.

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कायदा हातात घेणा-यांचा मुलाहिजा ठेवायचा नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार