Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरद पवारच राज्य चालवत आहेत, उद्धवजींना भेटून काय उपयोग ?

शरद पवारच राज्य चालवत आहेत, उद्धवजींना भेटून काय उपयोग ?
, गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (15:57 IST)
”राज्यपाल काय म्हणाले ते मला माहिती नाही. ते कोणत्या हेतूनं म्हटले तेही माहिती नाही. पण मला विचाराल, तर आता सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. उद्धवजींना भेटून काय उपयोग आहे? एखादा प्रश्न सोडवायचा असेल, तर शरद पवारांना भेटावं लागेल. कारण उद्धवजी ना प्रवास करतात. ना व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे लोकांचं म्हणणं ऐकतात अस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीतील प्रश्नाच्या उत्तरात  सांगितल आहे. 
 
आता मंदिराचं. महाराष्ट्रातील २५ मोठ्या मंदिरांची व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे मीटिंग घ्या. सहा सहा महिने मंदिर बंद असल्यानं भक्त जी दक्षिणा टाकतात, ती बंद आहे. कर्मचाऱ्याचे पगार सुरू आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. अनेक मंदिर खूप सामाजिक कामं करतात. त्यांची गंगाजळी संपत चाललेली आहे. हे समजून घ्यायला पण त्यांना वेळ नाही. मग लोकांना देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे लोक असं म्हणतात की, त्यांना भेटून घ्या. गेल्या आठ नऊ महिन्यात माझ्या एकाही पत्राला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर आलेलं नाही. त्यामुळे जर अशी भावना निर्माण झाली. राज्यपालांनी काय म्हटलं मला माहिती नाही. पण, ही वस्तुस्थिती आहे. उद्धवजींनी मी इथे बसतो, चालवण्याचं कंत्राट तुम्ही घ्या, असं केलेलं दिसतं,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण