Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरद पवार तत्काळ पुणे भेटीवर जाणार

शरद पवार तत्काळ पुणे भेटीवर जाणार
, शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019 (16:36 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत ईडी भेट तहकूब झाल्यानंतर पवारांनी ट्विट करीत आपण तत्काळ पुणे भेटीवर जाणार असल्याचे म्हटले आहे. “पुणे शहर व जिल्ह्यातील बारामती, पुरंदर परिसरात मागील दोन दिवसांत अतिवृष्टीने व महापुराने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने त्या भागातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी मी तातडीने जात आहे, याची कृपया नोंद घ्यावी.” असे ट्विट त्यांनी केले आहे.
 
राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी स्वतःहून २७ सप्टेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पाहुणचार घेणार असल्याचे तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यानुसार, ते ईडीच्या कार्यालयाला भेट देणार होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर्व बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी झटका, 1 ऑक्टोबर पासून बदलण्यात हा नियम