Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिंदे-फडणवीस सरकारची कर्मचाऱ्यांना भेट

shinde devendra
, बुधवार, 11 जानेवारी 2023 (08:09 IST)
महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काल 10 जानेवारी रोजी एक मोठा निर्णय घेतला आहे.  आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.
या पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळत होता. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. 1 जुलै 2022 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन रचनेवरील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 34 टक्क्यांवरून 38 टक्के करण्यात आला आहे.
 
महागाई भत्त्यातील दरवाढ 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीतील थकबाकीसह यंदाच्या जानेवारी महिन्यातील वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहेत.  
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गौतम अदानी यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट