Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंढरपुरातील विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा धक्कादायक माहिती

vitthal pandharpur
, बुधवार, 13 डिसेंबर 2023 (16:51 IST)
महाराष्ट्राचे दैवत विठूमाऊलीचा श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंढरपुरात विठू माऊलीच्या प्रसादाचा लाडू नित्कृष्ट असल्याचा 2020-2021 वर्षाच्या अहवाल लेखा परीक्षात नोंदवला आहे.  

नागपुरात सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा वर्ष 2020 -2021 चा लेखा  परीक्षणाचा अहवाल व अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात मिळणाऱ्या लाडवाचा प्रसाद नित्कृष्ट असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. या अहवालामुळे विठ्ठल मंदिर समितीचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. 

अहवालानुसार मंदिरात भाविकांना प्रसादात दिले जाणाऱ्या लाडूच्या वाटपाचे बचत गटाला देण्यात आले असून बचत गट लाडू तयार करण्याचे काम करतात. जिथे हे लाडू बनवले जातात ती जागा अस्वच्छ आहे तसेच लाडूला ठेवण्यासाठी वापरली जाणारी ताडपत्री देखील अस्वच्छ असल्याचे सांगितले आहे.

मंदिर समिती स्वतः लाडवाचा प्रसाद तयार करून विक्रीस ठेवते. लाडूच्या पाकिटावर घटकांची नोंदी नाही, शेंगदाण्याच्या तेल ऐवजी सरकीच्या तेलाचा वापर केला जातो. तीन लाडूच्या पाकिटांची किंमत 20 रुपये ठेवण्यात आली आहे.हे लाडू भाविकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. बचत गटा बरोबर मंदिर समिती देखील तितकीच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.  या मागे जो कोणी आहे अद्याप त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. या वर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शेळके म्हणाले, राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागा कडून प्रसाद प्रमाणित केला जात असून या मधील त्रुटींना अहवालात नोंदवले आहे. आता यापुढे कोणतीही तक्रार येणार नाही. 
Edited by - Priya Dixit    

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जुनी पेन्शन लागू करण्यावरून सरकारी कर्मचाऱ्यांचे काम 14 डिसेंबर पासून बंद