Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

अनलॉक ५ साठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी

State Government issues
, गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (07:48 IST)
राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या 5 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.
 
काय उघडणार आहे 
 
-अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी
-राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु करायला परवानगी
- ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही
-डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
-मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवाव्या
- पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू होणार
 
काय बंद राहणार
शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाच कोविड सेंटर केली बंद