यवतमाळमध्ये वन्यजीव अभ्यासकांनी कृत्रिम पद्धतीने ठराविक तापमानावर सापाचीअंडी उबविण्याचा प्रयोग यशस्वी केला. नानेटी जातीच्या सापाचे १४ अंडे यातून उबविले आहेत. या प्रयोगातून वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन रिसर्च संस्थेच्या अॅनिमल केअर टेकर आणि सर्पमित्रांनी १४ पिलांना जीवदान दिले.
अॅनिमल रेस्क्यूअर सुमित आगलावे यांना शहरातील एका घरून कॉल आला. तिथे झाडांच्या कॅरिमध्ये सापाची १४ अंडी आढळली. ती त्यांनी अलगद मातीसह उचलून आणली. संस्थेचे अभ्यासक अंकित टेंभेकर यांनी कृत्रिमरित्या ह्युमिडिटी बॉक्स तयार केला. ३२ दिवस अंड्यांची जोपासना केल्यानंतर १४ पिलांचा जन्म झाला. सापाची अंडी मादीखेरीज उबवत नाही.