Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ताडोबा व्याघ्र प्रकल्प हाऊसफुल्ल, नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती

tadoba forest
, मंगळवार, 31 डिसेंबर 2024 (09:25 IST)
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती ठरले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक उत्सुक आहे.
 
तसेच जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील वन्यजीवप्रेमी तसेच देशी पर्यटकही उत्सुक आहे. पण, ताडोबात वाघ पाहण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला किमान दोन महिने वाट पाहावी लागेल, कारण फेब्रुवारीपर्यंत जंगल सफारीचे बुकिंग फुल्ल झाले आहे. ताडोबातील जंगल सफारी वाघांच्या दर्शनाची हमी देते, म्हणूनच वन्यजीवप्रेमी आणि पर्यटक ताडोबाकडे आकर्षित होतात. नागपूरला हवाई नेटवर्क, नागपूर ते ताडोबापर्यंतचे उत्कृष्ट रस्त्यांचे जाळे आणि ताडोबा परिसरात राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देणारे रिसॉर्ट यामुळे पर्यटक नेहमीच ताडोबाला पसंती देतात.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: मुंबईत राहणाऱ्या बांगलादेशींवर एकूण 195 गुन्हे दाखल