Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कलाकृतींना हजारो रसिकांकडून मिळाली दाद

vidrohi marathi sahitya smmelan
, सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (09:18 IST)
अमळनेर : येथील १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या सत्यशोधक मुक्ता साळवे बालमंचावरील बाल कलाकारांनी विद्रोहीच्या मंचावर सादर केलेल्या समूह गीते, नाट्यभिनय, वेशभूषा व प्रबोधन गीतांना उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. सर्व मुला-मुलींनी सुंदर सादरीकरण केले. नाट्याभिनयात विविध संदेश देणाऱ्या नाटिका पाहून प्रेषक मंत्रमुग्ध होऊन गेले होते. उद्घाटन प्रा.उल्हास पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी एल.जे गावित होते. यावेळी स्वागत शाम पाटील यांनी केले.
 
शहीद भगतसिंग युवा मंचचे दुपारच्या सत्रात उद्घाटन भरत यादव यांनी केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गोपाळ नेवे, पुरूषोत्तम आवारे पाटील होते. अध्यक्षस्थानी ॲड.नाना अहिरे होते. मंचचे संयोजक बळवंत भालेराव, प्रा यशवंत मोरे होते. सत्राची सुरूवात लोकशाहीर वामन दादा कर्डक यांच्या ‘वंदन माणसाला’ गीताने केली. अजय भामरे यांनी सुमधुर आवाजात गीत गायिले.
 
आदिवासी क्रांतिवीर ख्वाजा नाईक सभामंडपात साहित्य रसिकांच्या गर्दीने गच्च भरला होता. प्रा.मिनाक्षी वाघमारे यांचा ‘मी सावित्रीमाई फुले बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग साहित्य रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. बाल मंचावरील नियोजन स्नेहल शिसोदे, शैलजित शिंदे, भाविका वाल्हे, अजिंक्य सोनवणे, नाजमीन पठाण यांनी केले होते. बाल मंच व युवा मंचचे व्यवस्थापन संयोजक सोपान भवरे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.संदीप तायडे तर आभार महेश पाटील यांनी मानले.

Edited By -  Ratnadeep ranshoor
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

त्र्यंबकच्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी प्रशासन सज्ज