Publish Date: Sun, 04 Feb 2024 (16:57 IST)
Updated Date: Sun, 04 Feb 2024 (17:06 IST)
नर्सरीत शिकणाऱ्या एका चार वर्षीय चिमुकलीवर 55 वर्षीय सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात समता नगर येथे घडली आहे. शुक्रवारी ही मुलगी नर्सरीत गेली असताना तिथल्या सुरक्षा रक्षकाने तिला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून तिला स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर बलात्कार केले.
घटने नंतर मुलगी घरी गेल्यावर तिला त्रास होत असताना तिची आई तिला नजीकच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली. तपासणी केल्यावर डॉक्टरांनी तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. हे ऐकल्यावर पालकांना धक्काच बसला. पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन घडलेलं विचारलं तेव्हा मुलीने घडलेला प्रकार सांगितला.
पालकांनी त्वरित पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना सुरक्षा रक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत प्रकरणाची नोंद करत पोलिसांनी प्रकरणात दखल घेत 55 वर्षीय सुरक्षा रक्षकाला अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहे.