Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या अधिकारी, तंत्रज्ञांचे ऊर्जामंत्री यांनी केले कौतुक

युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या अधिकारी, तंत्रज्ञांचे ऊर्जामंत्री यांनी केले कौतुक
, मंगळवार, 18 मे 2021 (18:24 IST)
‘तौक्ते’ चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यातील 10752 गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले असून त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून 6040 गावातील वीजपुरवठा आज संध्याकाळ पर्यंत सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.
राज्यात शेकडो पोल पडले, तारा तुटल्या व जोरदार वारा व मुसळाधार पावसाने फिडर ट्रिप झाले. अंधाऱ्या रात्री तिमिराची तमा न बाळगता व रात्रभर जागून नागरिकांना सेवा दिली तसेच आताही वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महावितरण कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
राज्यात  एकूण 1546 उच्चदाब पोल वादळामुळे पडले व क्षतीग्रस्त झाले. त्यापैकी 425 पूर्ववत व दुरुस्त करण्यात आले आहे.
राज्यात एकूण 3940 लघुदाब पोल वादळामुळे पडले व क्षतीग्रस्त झाले  त्यापैकी 974 पूर्ववत व दुरुस्त करण्यात आले आहे.
वादळ व पावसामुळे राज्यात 93 हजार 935 रोहित्रांमध्ये बिघाड झाला होता त्यापैकी 68 हजार 426 दुरुस्त करण्यात आले आहे.
महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर अविरत काम करून चक्रीवादळामुळे अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत केला. या कामात स्थानिकांनी गावकऱ्यांनी महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांना खूप सहकार्य केले. त्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी त्यांचे आभार मानले आहेत. 
 
चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊनऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी एक कृती आराखडा तयार करून विविध ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. तसेच अधिकाधिक मनुष्यबळ या कामी लावण्याचे व लागणारी पुरेशी सामुग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार,
 कोल्हापूर, पालघर,पुणे,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे इत्यादी साठी 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सध्या कार्यरत आहेत. तसेच विभाग स्तरावर 46 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नुकसानीची व्याप्ती बघता सुमारे 622 रोहित्रे, सुमारे 350 किमी लांबीचे केबल, तसेच साडे तीन हजार किमी इतक्या लांबीचे वायर्स व 20 हजार 500 खांब उपलब्ध करून दिलेले आहेत.
नुकसानग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीने 13 हजार तंत्रज्ञांची फौज मैदानात उतरवली आहे. ज्यामध्ये स्वतःचे  9 हजारहुन अधिक तसेच कंत्राटी पध्दतीवर कार्यरत 4 हजारहून अधिक इतके मनुष्यबळ सध्या वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्यरत आहे.
हे काम करताना पाऊस, सोसाट्याचा वारा, उन्मळून पडलेली झाडे, बिघाड असलेली दूरसंचार यंत्रणा, खराब झालेले रस्ते या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तसेच या कामासाठी 200 हुन अधिक लहान मोठे ट्रक्स, सुमारे 50 क्रेन्स व जेसीबी मशीन आणि  सर्व उपकरणांनी सज्ज अश्या 200 चमू या कामासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.
 
46 लाख ग्राहकांवर परिणाम
या चक्रीवादळामुळे राज्यातील जवळपास 46 लाख 41 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला तर 34 लाख 14 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
या चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका  ठाणे जिल्ह्याला बसला असून यामुळे 7 लाख 85 हजार 519  ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 5 लाख 50 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. 
या चक्रीवादळाचा दुसरा मोठा फटका
रायगड जिल्ह्याला बसला असून यामुळे 7 लाख 73 हजार 760 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 5 लाख 10 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. 
पालघर  जिल्ह्यात 5 लाख 88 हजार 743 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 2 लाख 44 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. 
रत्नागिरी जिल्ह्यात 5 लाख 45 हजार 121 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 4 लाख 18 हजार 360 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 लाख 66 हजार 11 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 67 हजार 166 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले.
नाशिक जिल्ह्यात 3 लाख 29 हजार 304 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 2 लाख 72 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 2 लाख 96 हजार 965 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 2 लाख 49 हजार 601 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात 4 लाख 36 हजार 768 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता तर 4 लाख 8 हजार 89 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात 1 लाख 66 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 1 लाख 48 हजार 112 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात 1 लाख 55 हजार 543 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 1 लाख 53 हजार 715 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
विदर्भात  एकूण 53 हजार 392 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर जवळपास 50 हजार  ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
मराठवाड्यात 1 लाख 5 हजार 142 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर 1 लाख 3 हजार 924 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ, शरद पवार यांचे मंत्र्यांना पत्र