ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण इथे होळीच्या सणाला गालबोट लागले. होळी खेळताना दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. हे तलावात होळी खेळायला उतरले होते. या घटनेची चौकशी सुरु आहे. अशी माहिती कल्याणच्या पोलीस उपनिरिक्षकांनी दिली.
दुस-या एका घटनेत पालघर जिल्ह्यातल्या वसईमध्ये दूचाकीवरुन पडून काजल काळे या १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अंबाडी पुलावरच्या लोखंडी संरक्षक कठड्याला धडकून काजल आणि अक्षय पवार हे खाली पडले. त्यात काजलचा मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबिय मणिकपूर इथे होळी साजरी करायला आले होते.