Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बहिणीसोबत खेळताना उकळत्या दुधात पडून अडीच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

बहिणीसोबत खेळताना उकळत्या दुधात पडून अडीच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
, गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (13:51 IST)
जळगाव  जिल्ह्यातील पिंप्री खुर्द तालुका धरणगाव येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत चुलीवरील उकळत्या दुधात पडून एका अडीच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
रोहन सुभाष धोबी असे मृत बालकाचे नाव आहे. रोहनचे आजोबा एका दुध डेअरीवर कामाला आहेत. त्यामुळे रोहनच्या घरी तीन लिटर दुध रोज येते. दरम्यान 13 ऑक्टोबर रोजी सकाळच्या वेळेत अंगणातील चुलीवर दुध तापवण्यासाठी ठेवले होते. यावेळी रोहन त्याच्या बहिणीसोबत खेळत होता. खेळता खेळता रोहन हा चुलीजवळ गेला त्यानंतर तो उकळत्या दुधात पडला. यामुळे तो 36 टक्के भाजला होता. त्यास तात्काळ जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल केले गेले नंतर त्यास मुंबईला हलविण्यात आले होते. आठ ते दहा दिवस त्याच्यावर मुंबईतर उपचार करण्यात आले मात्र उपचारादरम्यान रोहनने मृत्यूला कवटाळले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात शाळांना 14 दिवसांच्या दिवाळीच्या सुट्ट्या