अकोल्यात बाळापूर गावात नदीपात्रात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम (7) आणि दानियाल मोह्हमद फैयाज (9) अशी मृत्युमुखी मुलांची नावे आहेत.
अकोला जिल्ह्यात बाळापूर येथे मन नदीच्या काठावर वस्ती आहे. लहान मुलं या नदीकाठी खेळत असतात .दोन्ही चिमुकले रविवारी संध्याकाळी नदीकाठी खेळत असताना तोल जाऊन पाय घसरून नदीपात्रात पडले आणि पाण्यात बुडाले अशी शक्यता वर्तवली जात आहे. चिमुकले पाण्यात पडले हे समाजात स्थानिकांनी धाव घेत मुलांना वाचविण्यासाठी उडी घेतली पण त्यांना वाचवता आले नाही. त्यापूर्वीच दोघांचा बुडून मृत्यू झाला. कुटुंबियांना माहिती मिळतातच त्यांनी धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मयत मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. बाळापूर पोलिसांनी घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.