दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवर पालकांना मोलाचा सल्ला दिला आहे. पण त्यापूर्वी प्रविण तरडेंनी याची सुरूवात स्वतःपासून केली आहे. फेसबुकवर प्रविण तरडेंनी आपल्या मुलासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये प्रविण तरडे आणि त्यांचा मुलगा सिंहगड किल्ल्यावर बसलेले आहेत. यावेळी प्रविण तरडे मुलाला लेखक रणजित देसाई यांची 'श्रीमान योगी' ही कादंबरी वाचून दाखवत आहे.
शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशातील प्रत्येकानेच जाणून घ्यायला हवा. यासाठी पालकांनी आपल्या मुलांसाठी खास प्रयत्न करायला हवे. मुलांना आपण ट्रिपला घेऊन जातोच. पण यावेळी आपण त्यांना महाराष्ट्रातला इतिहास जवळून अनुभवण्यासाठी गडकिल्ल्यांवर नेलं तर त्याचा फायदा सर्वाधिक होईल. अशा आशयाची पोस्ट केली आहे.
प्रविण तरडेंच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?
मुलांना ट्रिपला “ थंड हवेच्या “ ठिकाणी जरूर न्या .. पण आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं “गरम रक्त”सांडलं त्या गडकिल्ल्यांवर न्यायला विसरू नका .. तिथं बसून त्यांना शिवचरित्र वाचून दाखवा .. आजची संध्याकाळ सिंहगडावर ...