Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

It's a Baby Girl announcement message in Marathi मुलीच्या जन्माची गोड बातमी देणारे स्टेटस

बाबांच्या काळजाचा तुकडा आणि आईची सावली... 
आमच्या आयुष्यात आली आहे एक छोटी बाहुली!
 
घरात गुंजणार आता किलबिलाट, 
कारण आमच्या घरी आली आहे छोटीशी परी थाटात!
 
देवाने आम्हाला जगातील सर्वात मोठे बक्षीस दिले आहे
आम्हाला मुलगी झाली आहे!
 
तिचे छोटे पाय, आमचे मोठे स्वप्न... 
आज आमचं कुटुंब पूर्ण झालं. It’s a Baby Girl!
 
आमच्या घराची शोभा वाढवायला आणि 
आनंद द्विगुणित करायला 
आज कन्यारत्न जन्माला आले आहे
 
मऊ मऊ हात आणि गोड हसू, 
आता दिवसभर आम्ही तिच्याच कडे बघत बसू! 
आमची लाडकी परी आली
 
आमच्या घरी साक्षात लक्ष्मीचे आगमन झाले आहे, 
आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले!
 
लेकीचा बाप झाल्याचा आनंद काही वेगळाच असतो, 
देवाची अनमोल भेट मिळाली!
 
मुलगी ही आईचं दुसरं रुप असते
आज आमचं घर एका परीने उजळून निघालं!
 
"कन्यारत्न: घराचे सौंदर्य, मनाचे समाधान!" 
 
आज आमच्या आयुष्यात एक छोटी परी आली आहे
आम्हाला गोड मुलगी झाली आहे!
 
परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे मुलगी
आज मी बाळ मुलगी झाल्याचा आनंद अनुभवत आहे
 
आमच्या छोट्या राजकुमारीचे स्वागत करा
 
लेकीचा बाप झाल्याच्या आनंदाने हृदय भरून आलंय, 
हे सुख कशातही मोजता येणार नाही
 
खुशखबर! खुशखबर!
आमच्या घरी आज लक्ष्मी आली.
मुलगी झाली हो...
 
आई-बाबा झालो! 
आयुष्यातल्या सर्वात सुंदर वळणावर 
आज एका छोट्या परीने पाऊल ठेवले आहे
 
जिच्या येण्याने घर होईल नंदनवन, 
अशी राजकन्या आली आहे 
आज आमचे अंगण सजवायला

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाढदिवसासाठी अतिशय शाही आणि चविष्ट पर्याय रबडी गुलाब जामुन केक