Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपले एलपीजी कनेक्शन आधारशी लिंक करा आणि सबसिडी मिळवा, त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

आपले एलपीजी कनेक्शन आधारशी लिंक करा आणि सबसिडी मिळवा, त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
, सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (15:57 IST)
How to Link LPG Connection with Aadhaar Card: जर आपल्याला आपल्या  एलपीजी गॅस कनेक्शनवर (LPG Cylinder Connection) सबसिडीचा लाभ मिळवायचा असेल तर त्याला ताबडतोब आधार कार्डाशी लिंक करा. एलपीजी गॅस कनेक्शन आधार कार्डाशी जोडण्यासाठी आपल्याला कोणत्याही कार्यालयाला भेट देण्याची गरज नाही. आपण घरी बसून हे ऑनलाइन करू शकता. याशिवाय, आपल्याला  ऑफलाइन देखील हवे असल्यास, तुम्ही IVRS (Interactive Voice Response System) आणि SMS द्वारे LPG कनेक्शनला आधार लिंक करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रक्रियेबद्दल-
 
ऑनलाईन प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे-
1. आधार ऑनलाईन लिंक करण्यासाठी ,सर्वप्रथम UIDAI च्याResident Self Seeding च्या वेब पेजवर जा. तिथे विचारलेली सर्व माहिती भरा.
2. त्यानंतर तेथे LPG निवडा. मग त्यात तुम्ही एलपीजी कनेक्शननुसार योजनेचे नाव एंटर करा. इंडेन गॅस कनेक्शनमध्ये IOCL भरा आणि भारत गॅस कनेक्शन BPCL भरा.
3. नंतर खाली दिलेल्या यादीमध्ये वितरकाचे नाव निवडा.
4. नंतर आपला ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि धारक क्रमांक प्रविष्ट करून सबमिट करा.
5. त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि इ मेल आयडी वर एक  OTP पाठविण्यात येईल. .
6 या नंतर आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल ते भरा.
7  त्यानंतर दिलेल्या माहितीची पडताळणी होईल.
8. त्यानंतर त्याची सूचना आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येईल.
9. यानंतर आपले एलपीजी गॅस सिलिंडर आधारशी जोडले जाईल .
 
ऑफलाईन प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे-
1. सर्वप्रथम, एलपीजी आधार लिंकसाठी आपल्या वितरकाकडे अर्ज द्या.
2. नंतर आपल्या गॅस कनेक्शनच्या वेबसाइटवरून सहजपणे सबसिडी फॉर्म डाउनलोड करा
3. नंतर ते भरा आणि वितरक कार्यालयात जमा करा.
4. आपले एलपीजी गॅस कनेक्शन आधार कार्डाशी जोडले जाईल.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसते : गुरु माँ कांचन गिरी