हनी सिंग- शालिनी तलवार

अलीकडेच गायक हनी सिंगने शालिनी तलवारपासून घटस्फोट घेतल्यानंतर पोटगी म्हणून 1 कोटी रुपये दिले आहेत

आमिर खान-रीना दत्ता

आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांचा 2002 मध्ये घटस्फोट झाला. रिपोर्ट्सनुसार, आमिरने रीनाला पोटगी म्हणून 50 कोटी रुपये दिले होते

सैफ अली खान-अमृता सिंग

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा 2004 मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटादरम्यान 5 कोटींची पोटगी निश्चित करण्यात आली होती. तसेच सैफ मुलांच्या संगोपनासाठी दरमहा एक लाख रुपये देतो

संजय दत्त - रिया पिल्लई

संजय दत्त आणि त्याची दुसरी पत्नी रिया पिल्लई यांचा 2008 मध्ये घटस्फोट झाला. संजय दत्तने रियाला वांद्रे येथे सुमारे 8 कोटी रुपयांचे अपार्टमेंट दिले

आदित्य चोप्रा- पायल खन्ना

निर्माता आदित्य चोप्रा आणि त्याची पहिली पत्नी पायल खन्ना यांचा 2009 मध्ये घटस्फोट झाला. रिपोर्टनुसार, आदित्यने घटस्फोट सेटलमेंटसाठी 50 कोटी रुपये दिले होते

हृतिक रोशन-सुझान खान

हृतिकने 2014 मध्ये सुझैन खानला घटस्फोट दिला. रिपोर्टनुसार, हृतिकने सुझैनला पोटगी म्हणून 380 कोटी रुपये दिले होते

करिश्मा कपूर संजय कपूर

करिश्मा कपूरने 2016 मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत घटस्फोट घेतला. घटस्फोटादरम्यान दोघांमध्ये 14 कोटी रुपयांचा करार झाला होता. ज्या अंतर्गत संजय दर महिन्याला 10 लाख रुपये देतो

अरबाज खान- मलायका अरोरा

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. रिपोर्ट्सनुसार, दोघांनी परस्पर 15 कोटी रुपयांची पोटगी निश्चित केली होती

राधिका आपटेकडे लग्नाचा एकही फोटो नाही

Follow Us on :-