गणपती स्थापना सोपी पूजा विधी Ganesh Chaturthi 2022

गणेशमूर्ती आणण्यापूर्वी घर आणि दरवाजा सजवा आणि पूजेची तयारी करा

मग विधिवत जयजयकार करून गणेशाचा घरात प्रवेश करा. मंगल गीत गा आणि आरती करा

गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी उत्तर किंवा ईशान्य कोपरा स्वच्छ करून कुंकुमने स्वस्तिक बनवावे आणि हळदीने चार ठिपके करावेत

नंतर मूठभर अक्षता ठेवा आणि त्यावर एक लाकडी पाट ठेवा आणि त्यावर लाल किंवा पिवळा रंगाचा सुती कापड पसरवा

पाटासमोर रांगोळी काढा. तांब्याचा कलश पाण्याने भरून त्यात आंब्याची पाने ठेवा आणि त्यावर मोलीने बांधलेला नारळ ठेवा

सुवासिक अगरबत्ती, दिवा, आरतीचे ताट, आरतीचे पुस्तक, प्रसाद इत्यादी साहित्य आधीपासून जवळ ठेवा

ॐ पुण्डरीकाक्ष पुनातु, ॐ पुण्डरीकाक्ष पुनातु, ॐ पुण्डरीकाक्ष पुनातु असा जप करून गणेश मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी मंत्राचा जप करा

नंतर स्थापना करताना हा मंत्र म्हणा- गजाननं भूतगणादिसेवितम कपित्थजम्बू फल चारू भक्षणं। उमासुतम शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजम।। आगच्छ भगवन्देव स्थाने चात्र स्थिरो भव।

आता कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन ॐ गं गणपते नम: मंत्राचा जप करत मूर्तीला विराजित करा आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करा

आता गणपतीची पूजा केल्यानंतर आरती करून प्रसाद वाटप करा

Ganesha Sthapana 2022 नियम

Follow Us on :-