श्रीगणेशाय नमः ॥ जय सद्गुरु समर्था ॥ अनाथनाथा कृपावंता ॥ मुमुक्षु शरणांगत होता ॥ जन्मवार्ता तया नाहीं ॥ १ ॥ ऐसे देतसां कृपादानासीं ॥ म्हणोनि शरणांगत पायासीं ॥ भावार्थ धरून मानसीं ॥ शरण चरणांसी आलों असें ॥ २ ॥ मी तंव अनंत अपराधी ॥ अगणित पापाची वृद्धी ॥ परी कृपाळू...