श्रीगणेशाय नमः ॥ श्रीपांडुरंग रुक्मिणीरंगा ॥ मुनीमानस ह्रदयभृंगा ॥ नाम अनामातीत अभंगा ॥ नेई भंगा दुरितातें ॥ १ ॥ ऐका श्रोते सादर आतां ॥ मागील कथाभाग निरुता ॥ अनुमोदन देऊनि तत्वता ॥ परिसा आतां कथानक ॥ २ ॥ ऋषींमाजी शिरोमणी ॥ महाराज दुर्वासमुनी ॥ वासवाते विचारूनी ॥ निघता जाला तात्काळीक...