Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Akshay Tritiya 2023 निदान या प्रसंगीतरी याला मडकं म्हणू नका

matka pot
Webdunia
गुरूवार, 20 एप्रिल 2023 (14:55 IST)
अक्षय्य तृतीयेची पूजा करायची म्हणून खरेदीला गेलो होतो. माझे साहित्यिक मित्र ही खरेदीला आले होते.
 ते माझ्या कुंभार मित्राला म्हणाले "मडकं दे". 
तो पटकन त्यांच्याकडे बघून म्हणाला "या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका"
खरेतर मलाही माहित नव्हतं त्याला नक्की काय म्हणतात. उत्सुकते पोटी मी त्याला विचारले, "मग काय 
म्हणतात याला?". 
 
"स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे त्याला केळी व स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे त्याला करा म्हणतात". 
माझ्या मराठी शब्दकोषात दोन शब्द वाढले. 
मराठीत मातीच्या भांड्याला उपयुक्ततेनुसार व प्रसंगानुसार वेगवेगळ्या नांवांनी संबोधले जाते अशी माहिती 
झाली.
 
पाण्याचा ...माठ
अंत्यसंस्काराला...मडकं
नवरात्रात...घट
वाजविण्यासाठी...घटम्
संक्रांतीला...सुगडं
दहिहंडीला...हंडी
दही लावायला...गाडगं
लक्ष्मीपूजनाचे...बोळकं
लग्न विधीत...अविघ्न कलश
आणि
अक्षय्य तृतीयेला...केळी व करा
 
खरंच आपली मराठी भाषा समृद्ध व श्रीमंत आहेच. मला मंगल प्रसंगी हातात धरतात त्याला करा म्हणतात हे माहिती होते पण अक्षय तृतीयेला केळी व करा म्हणतात माहिती नव्हते, तुम्हाला माहीत होते का ?
 
-सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री सूर्याची आरती

Baisakhi 2025 Essay in Marathi शिखांचा सण 'बैसाखी'

हनुमानजींना चोळा अर्पण करण्याची योग्य पद्धत, नियम आणि साहित्य जाणून घ्या

आज हनुमान जयंतीच्या रात्री करा हे ५ उपाय, संकटे दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होतील !

कॉर्पोरेट जगात यशस्वीपणे टिकून राहण्यासाठी हनुमानजींकडून शिका हे १० गुण

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments