Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नमाज

Webdunia
सर्वक्तीमान अल्लाची प्रार्थना करणे म्हणजे नमाज. नमाज हा शब्द पर्शियन भाषेतील आहे. मुस्लिम धर्मात नमाजला मोठे महत्त्व आहे. मुस्लिम धर्म ज्या पाच श्रद्धांवर उभा आहे, त्यातील नमाज एक आहे.

नमाज पहाटे, दुपारपूर्वी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री अशा पाच वेळी पढली जाते. दिवसातून पाच वेळा नमाज पढणे फराज म्हणजे बंधनकारक आहे.

संपूर्ण नमाज अरेबिक भाषेत आहे. नमाज एकट्याने किंवा समूहात पढली जाते. यावेळी पवित्र स्थळ काबाच्या दिशेने तोंड करून कृती करणे अपेक्षित आहे. नमाज पढतेवेळी कपडे व शरीर पूर्ण स्वच्छ हवे.

त्यामुळे नमाज पढण्यापूर्वी वुजू ( हात, पाय तोंड धुणे) केले पाहिजे. जेथे ही प्रार्थना केली जाते ती जागाही स्वच्छ हवी. प्रार्थनेवेळी बसण्यासाठी असमन हवे. नमाज पढताना विशिष्ट प्रकारची टोपी डोक्यावर ठेवण्याची परंपरा आहे.

यावेळी पायात मात्र काहीही नको. नमाज पडण्यासाठी मशिदीतून अजान दिली जाते. नमाज पढण्यावेळी लोक रांगेत उभे राहून नियत वाचतात. नियत म्हणजे नमाजाचा हेतू असतो.

नियतमध्ये नमाजाचे नाव व किती संख्येच्या प्रार्थना त्यात आहेत, याचे विवरण असते. त्यानंतर तकबीर म्हणजे अल्ला हो अकबरचा नारा घुमतो. त्यावेळी हात खांद्याच्या पातळीवर वर केले जातात.

त्यानंतर किआम म्हणजे उभे राहून दोन हात कोपरात मोडून सुरा म्हटल्या जातात. किआमनंतर रुकू केले जाते. रूकू या विधीवेळी नमाजी आपले हात गुडघ्याला लावतात. त्यानंतर सिजदाह करतात.

या वेळी होणाया हालचालीमध्ये एक रकत पूर्ण होते. विशिष्ट रकत पूर्ण झाल्यानंतर आणि शेवटी उजवीकडून डावीकडे डोक्याची हालचाल करून सलाम केल्यानंतर नमाज पूर्ण होतो.

आजारी असल्यास व विशिष्ट अवयवांच्या दुखण्यामुळे हालचालींवर मर्यादा आल्यास बसून नमाज करण्यास परवानगी आहे. रोजच्या नमाजा बरोबरच समूहात काही नमाज पढावे लागतात.

जुम्मा, साप्ताहिक नमाज (फर्ज), रमजानच्या काळात वीस रकतांचा समावेश असलेला विशेष नमाज, दोन ईद (वाजिब) आणि जनाजा काढण्यावेळी नमाज पढला जातो.

अल्लाने नमाज स्वीकारली तर भक्तीच्या इतर कृतीही तो स्वीकारतो असे मानले जाते. नमाज पढल्याने सर्व पापे धुवून निघतात, असे समजले जाते. नमाजला महत्त्व न देणे म्हणजे पाप समजले जाते.

असे करणारा मनुष्य शिक्षेस पात्र असल्याचे प्रेषित मोहम्मद यांनी म्हटले आहे. नमाज घाईघाईत करणेही मान्य नाही. नमाज पढताना सर्वशक्तीमान अल्लापुढे पूर्णतः नतमस्तक झाले पाहिजे. त्याचे सर्वश्रेष्ठत्व मान्य केले पाहिजे. प्रार्थना करताना स्वतःला कमी समजले पाहिजे.

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments