Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इस्लाम आणि महिला

-शराफत खान

Webdunia
NDND
इस्लाममध्ये महिलांच्या अधिकारांविषयी काय म्हटले आहे हे जाणून घेणे जरूरीचे आहे. इस्लाममध्ये महिलांना फारसे स्थान नाही अशी एक गैरसमजूत आहे. अनेक मुस्लिमांनी आपल्या आचरणाने या गैरसमजाला पुष्टी दिली आहे. त्यातच तालिबानने अफगाणिस्तानात किंवा कट्टरपंथीय मुस्लिमांनी इतर देशांत महिलांविरोधात काही फतवे जारी केले आहेत. हे फतवे इस्लामच्या नावावर जारी केले असले तरी ती त्या धर्माची मते नाहीत. इस्लाम महिलांवर बंधने घालत नाही. इस्लाम दोषी ठरलेल्या कैद्याच्या मानव अधिकारांचीही काळजी घेतो, हा धर्म कुणाविरोधी कसा असू शकेल?

कुराणमध्ये महिलांविषयी काय लिहिलेय ते पाहणे महत्त्वाचे आहे. कुराणात म्हटलेय, की निसर्गाच्या कोमल सृजनापैकी महिला आहेत. त्यामुळे त्यांना त्रास होईल असे काम देऊ नये. त्यांच्याकडून जास्त वजन उचलू नये. थोडक्यात अवजड कामे पुरूषांनी करावी आणि महिलांची काळजी घ्यावी. (भावार्थ)

महिलांनी साधे वजन उचलू नये असे सांगणारा धर्म त्यांच्यावर अत्याचाराला परवानगी कशी काय देऊ शकेल? महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा संबंध इस्लामशी नाही. पण इस्लाममध्ये असे सांगितले आहे, असे सांगून ते धर्माला मात्र बदनाम करत आहेत.

इस्लाम समजून घेण्यासाठी त्याची संस्कृती आणि समाजरचना समजून घ्यावी लागेल. अफगाणिस्तानात काही तालिबानी कट्टरपंथीय जो मार्ग अवलंबंत असतील ती तिथली संस्कृती आहे. ते मार्ग म्हणजे इस्लाम नव्हे.

इस्लाम जगभरात समान आहे. अफगाणिस्तानात महिलांवर अत्याचार होत असतील ते चुकीचेच आहे. ती तिथली संस्कृती आहे. पण तेथील चष्म्यातून जगभरातील मुस्लिमांकडे पाहणे योग्य नाही. तिथे जे घडते तीच इस्लामी संस्कृती असेही समजू नये. इस्लाम महिलांवरील अत्याचाराला कधीही मान्यता देत नाही. उलट तो रोखण्याचाच प्रयत्न करतो. इस्लाम हा देशानुसार बदलतो असेही नाही.

कुराणमधील बहुतांश आयते ही पुरूष आणि महिला दोघांनाही संबोधून आहेत. कुराणच्या दोघांप्रती असलेला दृष्टिकोन समान आहे. महिला व पुरूष असा भेदभाव त्यात नाही. महिला व पुरूष दोघांनाही समान आत्मा आहे. त्यामुळे दोघांचे महत्त्वही सारखेच आहे, असे कुराणमध्ये म्हटले आहे.

तलाक- इस्लाममध्ये तलाक देणे सोपे असल्याचे म्हटले जाते. हे चुकीचे आहे. पुरूषांना कुठलाही विशेषाधिकार यात दिलेला नाही. इस्लाममध्ये महिलांची तलाक या विषयावर कोंडी होते हे म्हणणेही चुकीचे आहे. महिलांनाही हा अधिकार आहे.

पैगंबार साहेबांची एक हदिस आहे. त्यात ज्या गोष्टी मानवाने कराव्यात त्यात सगळ्यात नावडती गोष्ट तलाक आहे. या हदिसवरूनच इस्लामचा तलाकविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. आपल्या जोडीदाराची जीवनपद्धती इस्लामी नसेल, निर्दयी, त्रासदायक, पीडादायी असेल तर तलाक घ्यायला हरकत नाही, असे म्हटले आहे. तलाक हा अतिशय गंभीर विषय मानण्यात आला आहे. दैनंदिन जीवनात त्याचा विचारही करू नये असेही इस्लामचे मत आहे.
( या विषयावर आपले मत खाली मांडा)

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

रविवारी करा आरती सूर्याची

श्री जोतिबा चालीसा Jotiba Chalisa

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

Show comments