Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाल किताबानुसार, वर्ष 2021 मध्ये करा हे उपाय

webdunia
बुधवार, 6 जानेवारी 2021 (10:26 IST)
लाल 'किताब एक गूढ पुस्तक आहे. या मध्ये जे उपाय सांगितले आहे त्याहून अधिक त्यांच्या मध्ये खबरदारी घ्यायला सांगितली आहे. आम्ही सांगत आहोत नवीन वर्षाचे काही 10 उपाय ज्यांना वर्षातून किमान 2 वेळा करावं. असं केल्याने आपण प्रत्येक संकटा पासून वाचाल जेणे करून आपण प्रगती करू शकाल. चला तर मग जाणून घ्या त्या उपायांबद्दल.
 
1 पाण्याचे वेग-वेगळे नारळ घेऊन स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सदस्यां वरून 21 वेळा ओवाळून अग्नीमध्ये जाळून टाका. अशा प्रकारे 21 वेळा ओवाळून वाहत्या पाण्यात वाहून द्या. हे काम गुरुवारी करा. या मुळे सर्व इडा पीडा दृष्ट लागण्या सारखे त्रास दूर होतील.
 
2 तांब्याच्या भांड्यात पाणी भरून उशाशी ठेवून झोपा.सकाळी उठून हे पाणी बाहेर घाला किंवा बाभुळाच्या झाडात घालून द्या. असं किमान 11 दिवस करा. हे उपाय केल्याने शारीरिक आणि मानसिक विकार दूर होतील.
 
3 काळे आणि पांढरे दोनरंगी ब्लँकेट घ्या आणि 21 वेळा स्वतः वरून ओवाळून एखाद्या गरजू गरिबाला दान करून द्या. हे काम एक वेळा शनिवारी केल्यास चांगले आहे.
 
4 वाहत्या पाण्यात रेवड्या,बत्ताशे,मध किंवा शेंदूर वाहून द्या. हे काम मंगळवारी करावं तर जास्त चांगले आहे. असं केल्याने सर्व प्रकारचे मंगळ दोष दूर होतील.
 
5 कधी-कधी डोळ्यात काळासुरमा लावा. किमान 11 दिवस पर्यंत हे लावा. हे देखील मंगळाचे उपाय आहे.
 
6 वर्षात 2 वेळा एखाद्या अधूला, अपंगाला, तपस्वींना किंवा कुमारिकांना जेवू घाला. असं केल्याने सर्व प्रकारचे शनिदोष दूर होतील.
 
7 वर्षात किमान 2 वेळा हनुमानजींना चोळा एक वेळा मंगळवारी आणि दुसऱ्यांदा शनिवारी आवर्जून अर्पण करा. असं केल्याने हनुमानजींची कृपा मिळेल.
 
8 वर्षात किमान 2 वेळा कडुलिंब, पिंपळ, वड, शमी किंवा आंब्याचे झाड लावा. असं म्हणतात की जो माणूस एक पिंपळ, एक कडुलिंब, दहा चिंच, तीन कवठ, तीन बिल्व, तीन आवळा आणि पाच आंब्याचे झाड लावतो, त्याला कधीही नरक बघावे लागत नाही.
 
9 वर्षात 2 वेळा नाही तर किमान एकवेळा एखाद्या तीर्थक्षेत्री जावे. तीर्थक्षेत्रात जाण्याचा उल्लेख लाल 'किताब मध्ये आढळतो. या मुळे देवी-देवांचा आशीर्वाद मिळतो.
 
10 वर्षात किमान 2 वेळा प्राण्यांना आणि पक्षींना पोटभर जेवू घाला आणि त्यांना पाणी पाजा. असं म्हणतात की जी व्यक्ती आपल्या कुटुंबियांच्या सदस्यांच्या सम प्रमाणात रुपये घेऊन त्या रुपयांनी एका दिवसात 100 गायी किंवा कुत्र्यांना पोळी किंवा हिरवे गवत खाऊ घालते त्या व्यक्तीचे सर्व संकटे दूर होतात.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

संपूर्ण जगासाठी नास्ट्रॅडॅम्सनुसार वर्ष 2021 कसे आहे, जाणून घ्या