Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मकर राशी भविष्य 2021

Webdunia
बुधवार, 16 डिसेंबर 2020 (09:14 IST)
राशी आणि वर्ष 2021 हे वर्ष आपल्यासाठी कसे असणार जाणून घ्या
 
 
हे नवीन वर्ष आपल्यासाठी काय घेऊन आले आहे जाणून घेऊ या
मकर राशी ही खूप शांत आणि सहनशील आहे. या राशीचे लोक बऱ्याच काळापासून शनीच्या दशेमुळे समस्यांना सामोरी जात आहे. पण 2021 त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण घेऊन आला आहे. सर्वप्रथम त्यांना कोर्टाच्या सर्व प्रलंबित प्रकरणातून मुक्ती मिळेल आणि निकाल त्यांच्याच पक्षात लागेल.पैशाचा सुरू असलेल्या कुरबुरींपासून देखील आश्चर्यकारक आराम मिळेल. कुठून तरी एकत्ररित्या धनागमनाचे योग बनत आहे. आपला परीक्षेचा काळ संपला आहे. आता गोड फळ खाण्याची वेळ आली आहे आपल्याला सर्वीकडून आनंद मिळण्याचा अनुभव जाणवेल.नोकरीचे त्रास देखील संपतील. आपले धैर्यच आपली शक्ती आहे. आपले विरोधी देखील आपल्या या गुणांना जाणून आहे. म्हणून आपण मानसिक दृष्टया दृढ राहा बळकट बना.रागाला आपल्या जवळ येऊ देऊ नका.जीत तुमचीच होणार आहे.आपल्या कुटुंबासह आपल्या यशाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवासाची आपल्याला आवड आहे पण प्रतिकूल परिस्थितीमुळे  आपण प्रवास करू शकला नाही. पण या वर्षी प्रवास कराल.
 
आता आपले सर्व नैराश्य संपणार आहेत.आरोग्य जरी नरम राहिले तरी मनाला खूप बरे वाटेल. कारण आपण खूप उष्णता सहन केली आहे. खूप काही सहन केले आहे पण आपले सर्व काही चांगले आणि शुभ होणार आहे.आपल्या रोमँटिक आयुष्यात देखील हे वर्ष गोडवा वाढवेल आणि वैवाहिक आयुष्याला बळकट करेल. काही लोक परदेशात जाऊन वास्तव्यास होतील. तर काही लोकांचें  प्रवास घडतील. या वर्षी 2021 मध्ये मकर राशीच्या लोकांना चांगली मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. मोठी गोष्ट म्हणजे की त्यासाठी आपल्याला अधिक परिश्रम करावे लागणार नाही.जर आपण एखादे घर विकत घेण्याची योजना आखली असेल तर आपली ही इच्छा पूर्ण होईल. हे वर्ष प्रत्येक प्रकारे आपल्याला प्रगतीच्या शिखरावर पोहोचवेल. समाजात आपले आदर वाढतील  पण अहंकार बाळगू नका. 
  
रोमांस साठी कसे असणार हे वर्ष 2021 :
या राशीचे लोक शांतपणे प्रेम करण्यात विश्वास ठेवतात पण आपल्याला आपल्या जोडीदाराशी मन मोकळे पणाने बोलावे लागेल जेणे करून नात्यात गैरसमज होणार नाही. आपले मन लोण्याप्रमाणे आहे पण व्यक्तिमत्त्व कडक असल्यामुळे लोक आपल्याला समजून घेत नाही. खरे तर असं आहे की आपल्याला रोमांस कसे करावं हेच येत नाही पण या वर्षी आपल्याला आपल्या स्वभावात हे गुण विकसित करावे लागतील. आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवा. या वर्षी आपला जोडीदार आपल्याला एखादी भेटवस्तू देखील देऊ शकतो. आपल्या भावनांना मोकळे पणाने सांगा.वर्षाचे सुरुवातीचे 6 महिने उत्कृष्ट आहेत. ग्रह सांगत आहे की जोडीदारासह वेळ आनंदात घालवाल. विवाहित असाल तर मे ते ऑगस्टचा काळ आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. वैचारिक मतभेदांमुळे त्रास उद्भवतील पण नंतर स्थिती पुन्हा चांगली होईल.
 
आर्थिक व्यवहारासाठी कसे असणार हे वर्ष 2021 :
वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात आपली आर्थिक स्थिती बळकट होईल.अपेक्षे प्रमाणे आर्थिक उत्पन्न देखील वाढेल बऱ्याच काळापासून जे पैसे अडकलेले होते ते आश्चर्यरित्या मिळतील. त्याचा आपल्याला विश्वासच बसणार नाही.आपण खूप समाधानी असाल. म्हणून पैश्याची लालसा आपल्याला नाही. पण ग्रहांची स्थिती सांगत आहे की आपण करीत असलेले कष्ट फळ देतील या वर्षात खूप धनागमन होणार आणि आयुष्य सुरळीत आणि सोपे होईल. शेअर बाजारातून देखील धनप्राप्तीचे योग दिसत आहे.
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 :
वर्ष 2021ची सुरुवात नोकरदारवर्गासाठी फायद्याचा सौदा घेऊन येणार आहे. कामाबद्दल समर्पण वाढेल. आपली प्रतिमा कामाच्या ठिकाणी एक योग्य अधिकाराची असेल. व्यावसायिकांसाठी हा काळ विचारपूर्वक आपल्या व्यवसायाला पुढे वाढविण्याचा असेल. व्यवसायातून फायदा मिळविण्यासाठी 2021 चा सुरुवातीचा काळ आणि मे ते जुलै पर्यंतचा काळ चांगला राहील. या काळात आपल्याला पैसे मिळतील आणि अनेक प्रकारे फायदेशीर असेल. डिसेंबरचा महिना बरेच काही भेट वस्तू देऊन जाईल. विध्यार्थ्यांसाठी 2021 चा काळ अनुकूल आहे. वाईट व्यसनांना टाळावे .शिक्षणाच्या क्षेत्रात एक उज्ज्वल मार्ग आपली वाट बघत आहे.
 
आरोग्यासाठी कसे असणार वर्ष 2021 :
आरोग्याच्या दृष्टीने हे 2021 चे वर्ष कमकुवत असेल पण मनाने आपण खूप बळकट असाल.सामान्य सर्दी पडसं बद्दल दुर्लक्ष करू नका. आपण बऱ्याच दिवसांपासून वजन कमी करण्याचा विचार करीत आहात तर हे वर्ष आपल्याला तंदुरुस्त ठेवण्यात मदत करेल. ग्रहमान आपल्यासाठी अनुकूल आहे. वर्षाचे  शेवटचे महिने आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले राहतील. आपल्याला या काळात जुन्या समस्यांपासून आराम मिळेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti

कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले?

Kartik Amavasya 2024 कार्तिक अमावस्या कधी ? तारीख आणि पूजा विधी जाणून घ्या

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

Kotwal of Kashi काल भैरवाला काशीचा कोतवाल का म्हणतात?

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments