Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Numerology Lucky Number : मूलांक नव्हे तर भाग्यांक बघा आणि जाणून घ्या भविष्य 2021

Webdunia
गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (09:33 IST)
अंकशास्त्र अर्थात Numerology याचे ज्योतिष शास्त्रात विशेष महत्त्व आहे. या माध्यमातून न केवळ आपला स्वभाव तसेच भविष्य देखील बघता येऊ शकतो. मुलांक व्यतिरिक्त भाग्यांक बघून देखील भविष्य जाणता येतं. जाणून घ्या भाग्यांक कसे काढावे ते-
 
ज्या तारखेला आपला जन्म झाला आहे ती तारीख, महिना आणि वर्ष आपसात जोडून भाग्यांक अर्थातच लकी नंबर काढता येतो. जसे आपली जन्मतारीख 12 नोव्हेंबर 1975 असल्यास या प्रकारे भाग्यांक काढता येईल.
 
12-11-1975
 
1+2+1+1+1+9+7+5 = 27
 
2+7 = 9
 
भाग्यांक 1
आपल्यासाठी हे वर्ष खूपच छान जाणार आहे. 2021 च्या शेवटी आलेला नंबर एक आपल्याला ही नंबर वन ठेवणार आहे. भाग्याचे ग्रह रोमान्सच्या बाबतीत अनुकूल आहे. करियर मध्ये यश दिसून येत आहे तसेच व्यवसायदेखील प्रगतीचे चिन्ह आहेत. तरुणांना यश नक्कीच हाती लागणार आहे. नवीन ऊर्जा, नवीन आत्मविश्वास आपल्या मार्गाला सुरळीत करेल. महत्वाकांक्षा पूर्ण होतील. प्रभावशाली लोकांच्या संपर्कात राहाल. वाहन सुख मिळेल. एप्रिल नंतर सुख स्पष्ट दिसून येत आहे. नोकरीच्या क्षेत्रात एप्रिल आणि ऑगस्टचा महिना सावधगिरी बाळगावी लागणार. यावर्षी आपण भ्रमण करण्यावर तसेच मनोरंजनावर पैसे खर्च कराल. पाच अंकाचा हा वर्ष आपल्याला धन देणारा ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्यासाठी हे वर्ष उत्तमच आहे तरीही खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केलं तर पोटासंबंधी समस्या उद्भवू शकतात. नशा करत असाल तर सावध व्हा. ऑगस्टमध्ये अपघात होण्याचे संकेत दिसून येत आहे 
 
शुभ अंक: 1, 3, 9, 12, 27
शुभ रंग: केशरी, पिवळा, सोनेरी 
शुभ दिवस: रविवार आणि सोमवार
 
भाग्यांक 2
आपल्यासाठी हे वर्ष उत्तम आहे तरी काही क्षेत्रांमध्ये हे वर्ष आपल्याला खूप काही शिकवून जाणार. कामाप्रती गंभीर रहाल. मित्र आणि नातेवाईकांकडून मिळालेला सल्ला हा लाभकारी सिद्ध होईल म्हणूनच जवळीक लोकांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये. आपल्या रचनात्मक कार्यामुळे आपण प्रतिद्वंदींना मागे सोडण्यात यश मिळवाल. नोकरीत असणाऱ्यांसाठी स्थान परिवर्तनाचे योग बनत आहे. व्यवसायात प्रगती दिसून येत आहे ज्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्यासंबंधी गंभीर समस्या तर नाही तरी काही चढ-उतार राहतील. वर्षाचे प्रारंभिक तीन महिने आपण शारीरिक आणि मानसिक रुपाने अस्वस्थता जाणवाल. अशात वाहन चालवताना सावध रहा. प्रवासाचे योग देखील दिसत आहे.
 
शुभ अंक: 1, 2, 4, 7, 16, 25
शुभ रंग: गुलाबी, पांढरा, हिरवा 
शुभ दिवस: रविवार, गुरुवार आणि शुक्रवार
 
भाग्यांक 3
यावर्षी व्यावसायिक जीवनात अधिक चढ-उतार नसणार. वर्ष 2021 मध्ये आपल्याला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे. नोकरीत असणाऱ्यांची ट्रान्सफर होण्याचे योग आहे. स्पर्धात्मक परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाच्या शेवटी यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. कामामुळे प्रवास घडतील आणि हे प्रवास आपल्यासाठी फायदेमंद ठरणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्यासाठी देखील हे वर्ष उत्तम राहील.
 
शुभ अंक: 3, 9, 15, 12, 24
शुभ रंग: लाल, गुलाबी, जांभळा, निळा 
शुभ दिवस: मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार
 
भाग्यांक 4 
भाग्यांक 4 असणार्‍या जातकांसाठी हे वर्ष चांगले राहील. वर्ष 2021 मध्ये आपल्या अनेक इच्छा आणि ध्येय पूर्ण होतील परंतु पळापळी आणि अधिक परिश्रमाचे सकारात्मक परिणाम आपल्याला मे महिन्यानंतर मिळेल. आपण आखलेल्या योजनेप्रमाणे बचत करण्यात अक्षम राहाल. विवाहित असल्यास पती-पत्नीमध्ये सामंजस्य चांगलं राहील. वर्षाच्या शेवटी कुटुंबासह प्रवासावर जाण्याची योजना बनू शकते. जुने आजार आपल्याला त्रास देऊ शकतात. खाण्यापिण्यात सावध राहा आणि योग्य दिनचर्या अवलंबून आरोग्यकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.
 
शुभ अंक: 4, 8, 12, 13, 22
शुभ रंग: तपकिरी, निळा, खाकी
शुभ दिवस: रविवार, बुधवार आणि शनिवार
 
भाग्यांक 5
2021 या वर्ष भाग्य जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला साथ देणार आहे. करिअरमध्ये पुढे वाढण्यासाठी आपल्याला अनेक संधी मिळतील. आर्थिक दृष्ट्या वर्ष 2021 आपल्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येणार. अविवाहित तरुण-तरुणींसाठी हे वर्ष खूपच चांगले आहे. वर्षाच्या शेवटी आपला विवाह आपल्या आवडत्या साथीदारसोबत होण्याचे संकेत आहे. दातांसंबंधी काही समस्या उत्पन्न होऊ शकतात म्हणून नियमित मेडिकल चेकअप करण्याकडे दुर्लक्ष करु नये. जीवनात शंका आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते म्हणून शंका घेण्याची सवय सोडा.
 
शुभ अंक: 5, 14, 23
शुभ रंग: हिरवा, पांढरा, हलका खाकी
शुभ दिन: बुधवार, शुक्रवार आणि शनिवार
 
भाग्यांक 6
वर्ष 2021 मध्ये आपण अनेक महत्त्वाच्या कार्यांप्रती गंभीर राहाल. आपल्या लव-लाइफ साठी वेळ अनुकूल आहे परंतू व्यावसायिक जीवनात आपण महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळू शकता. व्यवसाया विस्तार करण्यात मात्र आपल्याला यश मिळेल. साधारण सीझनल आजारांपासून देखील या वर्षी आपल्याला आराम मिळेल. तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कंबरदुखी सारख्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं.
 
शुभ अंक: 6, 15, 24
शुभ रंग: हलका निळा, पांढरा, गुलाबी
शुभ दिवस: मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार
 
भाग्यांक 7
वर्ष 2021 चा पहिला भाग आपल्यासाठी आव्हात्मक असेल परंतू मे महिन्यानंतर भाग्य आपलं साथ देईल. सुरुवातीचा काळ धैर्य बाळगा. या दरम्यान कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळत असला तरी वर्षातील दुसर्‍या भागासाठी तयारी मात्र करुन ठेवा. अधिकारी आपल्या कामाने संतुष्ट राहतील आणि वेतन वुद्धीचे योग दिसत आहे. वर्षाच्या शेवटी बचत देखील होईल. निरोगी राहण्यासाठी तळकट, मसालेदार आणि जंक फूड घेणे टाळा. ऑगस्टचा महिना जरा त्रासदायक दिसत आहे. 
 
शुभ अंक: 7, 10, 19, 28
शुभ रंग: पिवळा
शुभ दिवस: रविवार, सोमवार आणि गुरुवार
 
भाग्यांक 8
कार्यस्थळावर अधिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. आपण केलेल्या कामामुळे बॉस प्रसन्न होऊन पदोन्नतीची शक्यता नाकारात येत नाही. व्यवसाय करणार्‍यांसाठी हे वर्ष शानदार राहील आणि व्यवसायात प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष यश देणारे ठरेल. शेअर मार्केटत गुंतवणूक करणे टाळा नाहीतर नुकसान झेलावं लागू शकतं. आरोग्याप्रती अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. निष्काळजीपणामुळे वर्षाच्या सुरुवातीला आरोग्यवर विपरित परिणाम दिसून येईल. सांधेदुखीची समस्या उद्भवू शकते.
 
शुभ अंक: 4, 17, 22
शुभ रंग: काळा, निळा, तपकिरी
शुभ दिवस: सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
 
भाग्यांक 9
या वर्षी आपल्याला आपलं इस वर्ष आपको अपने ध्येय पूर्ण करण्यासाठी योग्य योजना आखावी लागेल. जर आपल्याला यात यश मिळाले तर निश्चित ध्येय पूर्ण होण्यापासून कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही. जर आपण शासकीय कर्मचारी आहात तर हे वर्षाच्या मध्यकाळात इच्छेप्रमाणे ट्रांसफर होण्याची शक्यता दिसून येत आहे. भागीदारीत व्यापार करत असणार्‍यांसाठी हे वर्ष प्रगती प्रदान करणारे ठरेल. वर्षाच्या शेवटी कुटुंबासह भ्रमण करण्याची योजना बनू शकते. आपलं आरोग्य सामान्य राहील परंतू आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घ्या. वर्ष 2021 आपल्यासाठी आत्मनिरीक्षण करण्याचा काळ आहे.
 
शुभ अंक: 3, 5, 9, 12, 15, 21, 27
शुभ रंग: लाल, गुलाबी, नारंगी
शुभ दिवस: रविवार, मंगळवार आणि गुरुवार

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

Kotwal of Kashi काल भैरवाला काशीचा कोतवाल का म्हणतात?

Kaal Bhairav Ashtami 2024 भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्याचे उपाय

आरती शुक्रवारची

Utpanna Ekadashi 2024: उत्पन्ना एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments