Dharma Sangrah

अंक ज्योतिष : मूलांक 9 भविष्यफळ 2021

Webdunia
मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (19:34 IST)
मूलांक 9 आणि अंक शास्त्र भविष्य वर्ष 2021
मूलांक 9
जर आपला जन्म 9, 18, आणि 27 तारखेला झाला आहे तर आपला मूलांक 9 आहे. ज्याचे स्वामी मंगल ग्रह आहे. हा ग्रह खूप ऊर्जावान आहे. अशी लोकं नेहमी पुढे वाढून उंचावर पोहचण्याची इच्छा बाळगतात. हे आपल्या बुद्धी आणि परिश्रमाच्या बळावर सर्व अडथळे पार करतात. अशी लोकं नेहमी काही न काही नवीन करण्याची इच्छा ठेवतात आणि त्यासाठी तयार असतात. हे लोकं आपले प्रेम मिळविण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतात, कारण ह्यांना हे माहीत असत की जसे प्रेम आपण करतो समोरच्याने देखील तसे करावे. ही लोकं नोकरी कमी करतात आणि आपली आवड जसे की कला, संगीत आणि अभिनय मध्ये आवड दाखवतात. हे लोक चांगले समाजसेवक देखील असतात. मानवतेसाठी कोणत्याही गोष्टीचा त्याग करू शकतात. मूलांक 9 साठी हे वर्ष कामात संघर्ष दाखवणारा आहे, त्यामुळे ह्यांना खूप परिश्रम करून पुढे वाढावे लागेल तरच यशाची अपेक्षा करू शकाल.
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
मूलांक 9 साठी हे वर्ष 2021ज्याचा मूलांक 5 असून स्वामी ग्रह बुध आहे. 9 मूलांकाचे लोकं या वर्षी आपल्या कामात होणाऱ्या संघर्षामुळे लवकर रागावतील आणि त्या चुकीमुळे आपलेच काम खराब करतील.या वर्षी ह्यांना काही नवीन करण्याची संधी मिळेल. या मध्ये हे वर्ष 2021 मदत करेल. जुलै नंतर यांना काही नवीन प्रकल्प मिळतील. त्यामध्ये काही नवीन केल्यानं यांचे नाव आणि उत्पन्न देखील होईल. जे लोकं नोकरी करतात त्यांच्या साठी हे वर्ष चांगल्या पगारासह नवीन नोकरी घेऊन येत आहे. जे लोक पूर्वीपासूनच नोकरीत आहे, त्यांच्या साठी मार्चच्या नंतर बढतीची संधी मिळेल. ऑगस्टच्या नंतर अधिकाऱ्यांसह नात्यात काही अडचणी येईल, याचे कारण आपल्या सह काम करणाऱ्या लोकांची आपल्या पाठीमागे करत असलेली राजनीती असेल, म्हणून या गोष्टीसाठी सावधगिरी बाळगा.
 
आर्थिक दृष्ट्या कसे असणार हे वर्ष 2021 : 
या मूलांकसाठी आर्थिक दृष्ट्या हे वर्ष चांगले असेल कोणाच्याही बोलण्यात येऊन आर्थिक व्यवहार करू नका अन्यथा नुकसान संभवतो.आपण कर्ज घेऊन कोणतेही काम करू इच्छित आहात तर मे ते सप्टेंबर पर्यंत करू नका. आपल्याला कोणाकडून पैसे घ्यायचे असले तर ऑगस्टच्या नंतरचा काळ चांगला असेल. जे लोकं शेअर बाजारात आवड ठेवतात त्यांच्या साठी हे वर्ष यश घेऊन येत आहे. जमिनीत गुंतवणूक करावयाची असेल तर जून पर्यंतचा काळ उत्तम आहे. या वर्षी पगारात वाढ झाल्यामुळे आपली बरीच थांबलेली कामे पूर्ण होतील आणि आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ण कराल. वर्षाच्या अखेरीस वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीने देखील आपला फायदा होईल.
 
प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनासाठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
या मूलांकसाठी हे वर्ष चांगले राहील कारण आपण आपल्या कुटुंबासाठी काहीही करण्यास तयार असता. या वर्षी आपल्याला कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी मिळेल, जेणे करून आपण घरात एक छोटीशी पार्टी देखील आयोजित कराल. आपण या वर्षात कोणत्याही कामासाठी कुटुंबावर अवलंबून राहू नका. आपण ज्याचा वर प्रेम करता त्यांच्या सह आपण प्रेमाचे क्षण घालवाल आपण त्यांच्या सह बाहेर काही दिवसांसाठी लांब जाल. ज्यामुळे आपल्या नात्यात गोडवा येईल. आपण एकटे असाल तर आपल्याला एखाद्या पार्टी किंवा आपल्या कार्यक्षेत्रात इच्छित जोडीदार मिळेल. विवाहित लोकांसाठी हे वर्ष जोडीदारासह नात्याला गोड बनविण्याचे आहे. वर्षाचा मध्य काळ आपण आपल्या जोडीदाराच्या कामात साथ द्याल आणि भावनिक दृष्ट्या देखील त्यांना साथ द्याल. जर आपल्या आयुष्यात जोडीदाराच्या शिवाय इतर कोणताही साथीदार असेल तर या वर्षी आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल.
 
आरोग्यासाठी कसे असणार हे वर्ष 2021 :
या मूलांकाचा लोकांसाठी हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने स्वतःची काळजी घेण्याचे आहे. आपल्याला खाण्या पिण्यासह हवामानाची काळजी घ्यावी लागेल. कारण एकदा काय आरोग्य बिघडले की त्रास वाढतील. जर आपल्या पायात किंवा रक्तामध्ये काही त्रास असेल तर खूप सावधगिरी बाळगावी लागेल. असं काही असेल तर वेळेवर औषधोपचार घ्या. आपल्या रागामुळे आपल्याला उच्चरक्तदाब होईल आणि आपली तब्येत बिघडेल. वर्षाच्या अखेरीस एकाएकी मानसिक ताण आल्यामुळे अशक्तपणा आणि एकटेपणा जाणवेल असे असेल तर काही काळ बाहेर फिरून यावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

Saphala Ekadashi 2025 सफला एकादशी कधी? शुभ -मुहूर्त, नियम आणि महत्व जाणून घ्या

आरती मंगळवारची

मंगळवारी जेवणात हा पदार्थ नक्की बनवा, जीवनात सकारात्मकता येईल

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments