Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कन्या राशी भविष्य 2021

Virgo Horoscope 2021
Webdunia
मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (13:24 IST)
या राशीच्या लोकांसाठी वर्ष 2021 आश्चर्यकारकदृष्ट्या फायदेकारक असेल. या वर्षी आपली सगळी स्वप्ने न केवळ पूर्णच होणार तर एक चांगली व्यक्ती म्हणून देखील आपण स्वतःला सिद्ध करू शकाल. या वर्षी आपण खूप प्रगती करणार आहात. नशिबाचे तारे देखील चमकतील. आपल्याला भरभरून यशाची प्राप्ती होईल, असे आम्ही नाही तर आपल्या राशीतील तारे सांगत आहे. हे वर्ष आपल्यासाठी संस्मरणीय ठरेल. शैक्षणिक दृष्टया चढ-उताराची स्थिती असेल, कारण मधून -मधून काही अडचणी येतील. वर्ष 2021 मध्ये उच्च शिक्षणासाठीचे प्रयत्न करणाऱ्यांना चांगले निकाल मिळतील आणि आपल्याला मनाजोगता आनंद मिळेल. चला तर मग जाणून घेऊ या की रोमांस, धन, करिअर आणि आरोग्यासाठी हे वर्ष कसे राहील. 
 
रोमांससाठी कसे असणार हे वर्ष 2021 :
रोमांसच्या बाबतीत हे वर्ष आपली परीक्षाच घेईल पण आपण धीर ठेवा स्थिती आपल्या पक्षातच असेल. फेब्रुवारी मध्ये आपले जोडीदाराशी मतभेदामुळे नातं तुटण्याची शक्यता असेल. आपल्याला शक्य असल्यास सामंजस्याने गोष्ट हाताळून नात्याला सांभाळा.चांगला जोडीदार नशिबाने मिळतो.वर्षाच्या मध्य काळात गैरसमज दूर होतील आणि स्थिती आपल्या पक्षातच असेल.वर्षाच्या अखेरीस आपल्याला रोमँटिक जोडीदारासह वेळ घालविण्याची संधी मिळेल. विवाहित असाल तर या वर्षी एखाद्यी गोड बातमी मिळेल. आपल्या जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. कदाचित त्यांना आपल्या मध्ये दुरावा असल्याची जाण होत असेल. त्याची जपणूक करा आणि भेटवस्तू ची देवाण घेवाण करण्यात उत्साह घ्या. रोमांस करण्यासाठी तारे आनंदी दिसत आहे फेब्रुवारी मध्ये काळजी घ्या.
 
आर्थिक व्यवहारासाठी कसे असणार हे वर्ष 2021 :
वर्ष 2021 ची सुरुवात पैश्याचा बाबतीत साधारण असणार पण संपूर्ण वर्ष धनागमनाची आवक सुरुच राहील. विशिष्ट परिस्थितीत काही लोकांना जमिनीपासून फायदा संभवतो. गुप्तधन मिळण्याचे योग संभवतात. या वर्षी गुंतवणुकीत देखील फायदा मिळेल. एखाद्या योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. वर्षाच्या अखेरीस बचत होईल. अडकलेले पैसे मिळतील. एकंदरीत पैश्याच्या बाबतीत सितारे आपल्या पक्षात दिसत आहे. सुरुवातीचे दोन महिने कमकुवत असतील. मार्च पासून नशीब वेगानं धावेल जे डिसेंबर 2021 पर्यन्त धावेल. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा निष्काळजीपणाने वागू नका तर हे वर्ष आपले सर्व स्वप्नांना पूर्ण करणार ठरेल.  
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 :
वर्ष 2021 नोकरदार वर्गासाठी आर्थिक उत्त्पन्न चांगले राहील. संपूर्ण वर्षात आपल्याला यशाची वार्ता मिळेल, म्हणून आपल्या कामावर एकाग्रता ठेवा. परिश्रम करा. विशेषतः फेब्रुवारी, मे, जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबरचा काळ नोकरीत चढ -उताराचा काळ असेल. कन्या राशीच्या मोठ्या व्यवसायी लोकांना हे वर्ष आर्थिक दृष्टया बळकट बनवेल. बऱ्याच योजनांना अमलात आणून आपल्या पक्षात असतील. बरेच सौदे चांगले होतील. वर्ष 2021 मध्ये लहान व्यावसायिक देखील आर्थिक दृष्टीने बळकट होतील. काही नवीन संधी उपलब्ध होतील म्हणून वेळेचा चांगला उपयोग करा. वर्षाचे अखेरचे महिने देखील खूप चांगले जाणार आहे.
 
आरोग्यासाठी कसे असणार वर्ष 2021 : 
प्रत्येक बाबतीत हे वर्ष आरोग्याच्या बाबतीत मिश्रित फळे देणारा असेल. एखाद्यी किरकोळ शल्यचिकित्सा संभवते पण कोणतेही मोठे त्रास दिसत नाही. खाण्या-पिण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यास पोटाचे त्रास संभवतील. गळ्याचे त्रास देखील होऊ शकतात. म्हणून स्वतःची काळजी घ्या. जर नवीन वर्ष आपल्यासाठी सर्व बाबतीत आनंदी आहे तर आरोग्याच्या बाबतीत देखील आपण ह्याला चांगले बनवा. नियमितपणे दिनक्रम बनवा आणि योग, प्राणायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Papmochani Ekadashi 2025 नकळत घडलेल्या पापांचा नाश होतो म्हणून करावे पाप मोचनी एकादशी व्रत

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

आरती मंगळवारची

मंगळवारचे उपास कधी पासून सुरु करावे जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

पुढील लेख
Show comments