Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 3 ते 9 जानेवारी 2021

Webdunia
शनिवार, 2 जानेवारी 2021 (17:37 IST)
मेष : हा आठवड्यात आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व कौटुंबिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती पूर्वपदावर येईल. शांतता टिकून राहील व सर्वत्र यश समोर दिसेल. अंतिम चरणात दीर्घकालीन गुंतवणूक करण्यात उपयुक्त व भावी काळाच्या दृष्टीने लाभदायकतेचा कालखंड आहे. अपूर्ण व्यवहार कामे गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील व मनावरील काळजीचे दडपण मिटेल. 
 
वृषभ : संततीबाबत आनंद वार्ता हाती येतील. हातात पैसा खेळता राहून आर्थिक टंचाई जाणवणार नाही. अचानक धनलाभ संभवतो व इतरांकडून आर्थिक सहकार्य वेळेवर मिळून आर्थिक समस्या मिटतील. अंतिम चरणात दूर निवासी असणार्‍या प्रिय व्यक्तीचे अनुकूल व चांगले दूरध्वनी येतील. मनावर असलेले काळजीचे दडपण दूर होऊन मानसिक आनंद वाढून समाधान लाभेल. 
 
मिथुन : सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीत राहतील. विरोधक मंडळींचा ससेमिरा व त्रास मिटण्याच्या मार्गावरच राहू शकेल. अंतिम चरणात भागीदारीमधून अपेक्षित स्वरूपाचा असणारा लाभ मिळेल. कार्यक्षेत्रात आपला दबदबा कायम राहील व जे कार्य इतरांना शक्य झाले नाही ते कार्य आपल्या हातून पूर्ण होऊ शकेल. 
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात काही बाबतीत अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. प्रवासात विशेष दक्षता घेणे उचित ठरेल व होणारे नुकसान काही प्रमाणात टळू शकेल. कर्ज व्यवहारात विलंब व अडथळे जाणवतील. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल स्थितीच राहील व मनावर असलेले काळजीचे दडपण दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधकच ठरेल.
 
सिंह : या आठवड्यात उधारी वसुलीचे संकेत व सूचना प्राप्त होतील. आर्थिक आवक समाधानकारक स्थितीत राहून आर्थिक टंचाई जाणवणार नाही. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे काही प्रमाणात दगदग व त्रास निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल.
 
कन्या : प्रगतीचा मार्ग खुलाच राहील. दीर्घ कालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडेल. मानसिक आनंद वाढीस लागेल. अंतिम चरणात आपले सहकार्य इतरांच्या बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होईल. अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. धनलाभ होऊ शकतो.
 
तूळ : सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील. त्यामुळे अपयशाचा सामना करावा लागणार नाही. क्रीडा क्षेत्रातील वर्चस्व प्रस्थापित स्वरूपातच राहू शकेल व बक्षीसपात्र स्थिती कायम राहील. अंतिम चरणात नोकरीत बढतीचे योग जुळून येतील. अधिकारी वर्गाची मर्जी राहील व त्यांनी सोपविलेली कामगिरी आपल्या हातून पूर्ण होऊ शकेल. 
 
वृश्चिक : महत्त्वपूर्ण कामाच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम वाढवावे लागतील. अपेक्षित यश मिळू शकेल. अंतिम चरणात धार्मिक स्वरूपाच्या कार्यक्रमानिमित्त प्रवास योग जुळून येईल व प्रवास अनुकूलतेचा ठरेल. कोणत्याही बाबतीत सहसा अपयशाचा सामना करावा लागणार नाही व यश समोर दिसेल.
 
धनू : नवीन भागीदारी प्रस्ताव समोर आल्यास त्याचा स्वीकार जरूर जरूर करावा भावी काळासाठी तो लाभप्रद ठरू शकेल. अंतिम चरणात सर्वत्र अडथळेचा सामना करावा लागेल व जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकण्यापुरतेच र्मयादित ठेवणे उचित स्वरूपाचेच ठरू शकेल.
 
मकर : काही बाबतीत दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल. जवळचा प्रवास योग घडून प्रवास कार्यसाधक ठरेल. अंतिम चरणात इतरांनी दिलेले आर्थिक मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास सर्मथ स्थितीतच राहतील. जुन्या गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ हाती येण्याचे संकेत व सूचना प्राप्त होऊन भावी काळातील आर्थिक समस्या मिटेल.
 
कुंभ : इतरांकडून आर्थिक सहकार्य वेळेवर मिळण्यास अडथळे व विलंब लागेल. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवीचे मार्गदर्शन घेणे आवश्यक ठरेल व भावी काळात होणारे नुकसान टळू शकेल. अंतिम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रातील कामगिरी बक्षीसपात्र स्थितीच राहील. कार्यक्षेत्रात सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती सुधारेल.
 
मीन : स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे सुरळीतपणाच्या मार्गावरून पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात येतील व मनावर असलेले काळजीचे सावट मिटेल. अंतिम चरणात पारिवारीक वातावरण उत्साहवर्धक स्थितीत राहील व कौटुंबिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल व शांतता टिकून राहू शकेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Panchak 2025 फेब्रुवारीमध्ये या तारखेपासून दोषमुक्त पंचक सुरू, अशुभ काळ किती काळ टिकेल जाणून घ्या

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी Essay On Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विचारले जाणारे प्रश्‍न

श्री गजानन महाराज पादुका पूजन विधी

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments