Festival Posters

साप्ताहिक राशीफल 13 ते 19 जून 2021

Webdunia
शनिवार, 12 जून 2021 (21:58 IST)
मेष : नियमित उपक्रमांमध्ये येणारी व्यापकता आणि नव्या व्यक्ती, नव्या संस्थांशी येणारे संबंध व्यापकता आकर्षक करणारे ठरतील. आर्थिक प्रगती, नवीन उद्योगाचे वेळापत्रक, परदेशी प्रवास, राजकीय सत्ता, बौद्धिक प्रांतातील प्रभाव असे विभाग त्यात असतील. अष्टमात बुध-राहू सहयोग असेपर्यंत चर्चा आणि कृती यांना प्रकाशात आणू नका. 
 
वृषभ : गुरू, मंगळ, शनी अशा ग्रहांच्या अनिष्ट काळात प्रत्येक शब्द विचाराने वापरावा लागतो. प्रत्येक पाऊल जपून पुढे टाकावे लागते. छोटी चूक मोठे घोटाळे निर्माण करणारी ठरू शकते. भाग्यात शुक्र हाच मोठा आधार आहे. त्यामुळे कार्यपथावरील प्रवास उत्साहाने सुरू ठेवू शकाल. बुध-राहूची अनुकूलता इभ्रत सांभाळण्यास उपयुक्त ठरेल. 
 
मिथुन : शनी-मंगळासारखे ग्रह अनुकूल, त्यात गुरूची कृपा, मिथुन व्यक्तींचा प्रवास वेगाने होत राहील. त्याचा मार्ग प्रगतीच्या प्रांतामधूनच राहणार असल्याने शनिवारच्या चंद्र-हर्षल युतीपर्यंत काही चमत्काराचे प्रसंग, काही सहज घटनांचा प्रवेश यातून मिथुन व्यक्तींचं श्रेष्ठत्व सिद्ध होत राहील. षष्ठांत बुध-राहू सहयोग शुक्र अष्टमात संशयातून उत्साह अडचणीत येणार नाही एवढं फक्त बघा.
 
कर्क : पंचमात राहू, सप्तमात शुक्र, दशमांत गुरू-सिंह-मंगळ महत्त्वाची प्रकरणे मार्गी लावता येतील. नवीन क्षेत्रात प्रभाव निर्माण करता येईल. परिवार आणि व्यवहार यामधील बरेच दडपण यातून कमी होतील. चतुर्थात शनी असेपर्यंत न्यायालयीन कामकाजात दुर्लक्ष करावयाचे नसते. कारस्थानी भाऊबंधावर लक्ष ठेवावे लागते. षष्ठातील रवी त्यासाठी भरपूर सहकार्य करणारा आहे. स्पर्धा, साहस, वाद कटाक्षाने टाळा. यश सोपे होईल, व्यापक करता येईल.
 
सिंह : राशिस्थानी मंगळ, पराक्रमी शनी, पंचमात सूर्य, भाग्यात गुरू अशी समर्थ ग्रहस्थिती अनुकूल असलेला काळ अनेक दशकानंतर लाभलेला आहे. नजिकच्या काळातील अवघड समस्या दूर करून काही क्षेत्रात जम बसवून घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आर्थिक, व्यावसायिक, राजकीय क्षेत्रात आणि बौद्धिक, शैक्षणिक विभागात सिंह व्यक्ती विक्रमही प्रस्थापित करू शकतील. परदेशी प्रवास संभवतात. 
 
कन्या : साडेसाती, अष्टमात गुरू, व्ययस्थानी मंगळ, व्यवहाराची गणित मधूनमधून चुकतात आणि ठरवलेले कार्यपत्रक त्यामुळे संकटात सापडते. शनिवापर्यंत असल्या प्रसंगाशी संयमाने सामना करावा लागेल. पराक्रमी राहू, अनुकूल बुध, शुक्र प्रयत्नांचा वेग आणि उत्साह यांना अशुभ ग्रहांच्या परिणामांपासून संरक्षण देऊ शकते. त्यातून बाजारपेठेतील प्रतिष्ठा सांभाळता येईल. 
 
तूळ : पराक्रमी सूर्य, चतुर्थात शुक्र, सप्तमात गुरू, लाभात मंगळ सफलता संपादन करण्यासाठी तूळ व्यक्तींना प्रत्येक संधीचा उपयोग करून घेता येईल. संपर्क, संबंध, चर्चा, भेटी, शासकीय नियम आणि प्रतिष्ठितांचे सहकार्य यांचा समावेश त्यात राहील. साडेसातीची शक्ती, प्रार्थना आणि हुशारी यांच्यामधून बरीच कमी करता येईल. नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. 
 
वृश्चिक : राशिस्थानी राहू, द्वितीयात सूर्य प्रसन्न बुध, शुक्र, दशमात मंगळ यांच्या शुभ परिणामांशी प्रयत्न, हुशारी यांचा समन्वय साधला तर गुरू-शनीची अनिष्टता नियंत्रित करून शनिवापर्यंत मजल-दरमजल प्रगतीच्या दिशेने प्रवास सुरू ठेवता येईल. त्यात व्यापारी गिऱ्हाईक वाढतील. राजकीय प्रतिष्ठा उंचावेल. अर्थप्राप्ती आकर्षक होईल. 
 
धनू : राशिस्थानी सूर्य, पंचमात गुरू, भाग्यात मंगळ, लाभात शनी यांच्या ग्रहकाळात प्रशंसनीय यशाने कर्तृत्व उजळून निघते. रविवारच्या चंद्र-मंगळ नवपंचम योगापासून त्याचा आपण असाल त्या कार्यक्षेत्रात सुरू होणार्या प्रक्रियेमधून प्रचीती येणार आहे. व्यासपीठ गाजवाल, रंगभूमी रंगवाल, व्यापारात सबळ होता येईल. मंगलकार्य ठरणे, जागेचा प्रश्न सुटणे अशाही घटनांचा समावेश त्यात होऊ शकतो.
 
मकर : काही प्रांतात अटीतटीचा सामना सुरू असणे शक्य आहे. राशिस्थानी शुक्र, दशमात शनी, लाभात राहू कोणताही सामना प्रतिष्ठेपर्यंत पोहोचणार नाही. याच ग्रहांमुळे नोकरी, धंदा, कला, राजकारण यामध्ये नवे निर्णय, नवी कृती करता येणे शक्य होईल. यशासाठी थोडे थांबा, अनिष्ट ग्रहांचे वादळ फार दिवस चालणार नाही.
  
कुंभ : लाभात सूर्य, पराक्रमी गुरू, दशमात राहू, भाग्यात शनी नेत्रदीपक यशाचे ग्रहपर्व सुरू असते अशाच वेळी व्यवहारात नवी केंद्र उभारता येतात. नवे संपर्क यशस्वी ठरतात. त्यातून नवी आसामी म्हणून नावारूपास येणे शक्य होते. रविवारच्या चंद्र-मंगळ नवपंचम योगापासून कुंभ व्यक्तींना याचा प्रय्तय यावा, दूरच्या दृष्टीने प्रयत्न, कृती यात व्यापकता ठेवावी. 
  
मीन : सूर्य, शुक्र, गुरू, राहू अशा ग्रहांची राशी कुंडलीमधील बैठक झकास जमली असल्याने प्रयत्नाने केलेली कृती अपेक्षेपेक्षा अधिक यश देणारी ठरू शकते. मंगळ षष्ठात असल्याने शत्रू पुढे सरकू शकणार नाही. कार्यप्रांतातील प्रगती प्रदीर्घ असावी, यासाठी संरक्षण व्यवस्था याच वेळी करून ठेवावी. त्याचा उपयोग आर्थिक प्रगती, सामाजिक उपक्रम, नवे परिचय, राजकीय बदल, नवीन नोकरी, परिवारातील प्रसन्नता यासाठी करता येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Famous Datta Temples महाराष्ट्रातील श्री दत्तात्रेयांची प्रसिद्ध आणि जागृत देवस्थाने

Sant Rohidas Punyatithi 2025 रोहिदास महाराजांची चमत्कारिक भक्ती: विठ्ठल स्वतः आले मदतीला

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

Margashirsha Guruvar 2025 Puja Aarti Katha मार्गशीर्ष गुरुवार श्री महालक्ष्मी व्रत संपूर्ण विधी

श्री दत्ताची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments