rashifal-2026

मूलांक 1 अंक ज्योतिष वार्षिक भविष्यफळ 2023

Webdunia
रविवार, 4 डिसेंबर 2022 (08:02 IST)
मूलांक 1 (कोणत्याही महिन्याच्या 1, 10,19, 28 तारखेला जन्मलेले लोक)
Numerology 2023 Moolank 1
 
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 1 असतो. अंकशास्त्रानुसार संख्या 1 सूर्याचे प्रतिनिधित्व करते. मूलांक 1 असलेल्या लोकांमध्ये अनेक सकारात्मक गुण असतात, ज्यात उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्ये, ज्ञानाचा खजिना आणि फायटर बनण्याची क्षमता असते. ते केवळ करिअर ओरिएंटेड असतात. ते परिस्थिती हाताळण्यात खूप चांगले असतात. यासोबतच प्रत्येक क्षेत्रात अष्टपैलू खेळाडू असतात. एकूणच 1 हा एक भाग्यवान क्रमांक आहे, परंतु या क्रमांकाचे लोक नेहमी आक्रमक, कठोर आणि वर्चस्ववादी असतात, जे त्यांना जीवनाचा आनंद घेण्यापासून काहीवेळा प्रतिबंधित करतं. इतरांशी संवाद साधताना या लोकांनी काळजी घेतली पाहिजे. सर्व परिस्थितीत शांत राहावे. 2023 मध्ये तुम्हाला काही चढ-उतारांचा अनुभव येईल आणि तुम्हाला या वर्षी काही महत्त्वाची उद्दिष्टे गाठण्यासाठी काही अडथळे पार करावे लागतील.
 
मूलांक 1 च्या लोकांसाठी करिअर आणि आर्थिक परिस्थिती भविष्यफळ 2023
अंकशास्त्रानुसार वर्ष 2023 मध्ये मूलांक 1 च्या लोकांना त्यांच्या करिअर आणि आर्थिक विकासात किरकोळ चढ-उतार येऊ शकतात. या वर्षी यशस्वी होण्यासाठी तसेच अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अधिक प्रयत्न करावे लागतील. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2023 मध्ये अपेक्षित यश आणि परिणाम मिळू शकतात. खर्चाच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागेल. काळजीपूर्वक नियोजन करावे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला या वर्षी पदोन्नतीसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. लोक तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु शक्य तितका संयम आणि प्रेरणा असू द्या आणि रागावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करा.
 
मूलांक 1 च्या लोकांसाठी प्रेम, विवाह आणि नातेसंबंध भविष्यफळ 2023
2023 हे वर्ष मूलांक 1 च्या लोकांच्या आयुष्यात प्रेम आणि नातेसंबंधांसाठी शुभ आहे. यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. जवळचे संबंध सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा गैरसमज टाळण्यासाठी सर्व तथ्य पूर्णपणे जाणून घ्या आणि समजून घ्या. ज्या लोकांना लग्न करायचे आहे किंवा अविवाहित आहे या वर्षी त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये त्यांना यश मिळू शकते.
 
मूलांक 1 च्या लोकांसाठी कौटुंबिक आणि सामाजिक जीवन भविष्यफळ 2023
वर्ष 2023 मध्ये मूलांक 1 च्या जातकांना सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात संतुलन राखावे लागेल, अनेक गोष्टी तुमच्या बाजूने काम करतील. जर तुम्ही तुमचा पुरेसा वेळ तुमच्या कुटुंबासमवेत घालवला नाही तर गोष्टी तुमच्या विरुद्ध होऊ शकतात. यासोबतच या काळात तुम्ही तुमच्या वडिलांची विशेष काळजी घ्यावी, कारण आरोग्यासंबंधी समस्या येण्याची शक्यता आहे. तणाव टाळा आणि प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पहा. एक वेळ येईल जेव्हा तुमचे संपूर्ण कुटुंब काही आनंदाचे प्रसंग साजरे करतील. कर्मावर विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत राहा, इतरांच्या मतावर विसंबून राहू नका.
 
मूलांक 1 च्या लोकांसाठी शिक्षण भविष्यफळ 2023
वर्ष 2023 मध्ये संशोधन क्षेत्रात मूलांक 1 असलेले विद्यार्थी चांगली कामगिरी करतील. सरकारसाठी काम करू इच्छिणाऱ्या इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आव्हानांना सामोरे जावे लागते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. एकूण 2023 विद्यार्थ्यांसाठी यशस्वी वर्ष असेल. विद्यार्थ्यांना हवे ते साध्य करता येईल. ध्यानाची मदत घेता येईल. शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. अधिक सावध राहण्याची आणि चुकीची संगत टाळण्याची गरज आहे. आपल्या छंदावर लक्ष केंद्रित करा आणि ते नवीन मार्गाने विकसित करा.
 
मूलांक 1 च्या लोकांसाठी 2023 या वर्षी करण्यासारखे उपाय
उजव्या हातात लाल धागा बांधावा आणि अनामिकाने भुवयांमध्ये लाल कुंकुवाचा टिळा लावावा.
प्रत्येक महिन्यात एकदा हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.
हनुमान मंदिराबाहेर बसणार्‍यांना कपडे दान करावे.
 
शुभ रंग - सोनेरी आणि केशरी
शुभ नंबर - 1 आणि 9
शुभ दिशा - पूर्व आणि दक्षिण
शुभ दिवस - रविवार आणि गुरुवार
अशुभ रंग - काळा आणि गडद निळा
अशुभ नंबर - 8
वाईट दिशा - पश्चिम
अशुभ दिवस - शनिवार

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Bhaum Pradosh Vrat 2025 मंगळवारी भौम प्रदोष, नकारात्मक प्रभावापासून वाचण्यासाठी शिवलिंगाला या वस्तू अर्पण करा

Mokshada Ekadashi Vrat Katha मोक्षदा एकादशी व्रत कथा

आरती गीतेची

Gita Jayanti 2025 गीता जयंती; तारीख, मुहूर्त, पूजा विधी आणि महत्तव जाणून घ्या

Bilvaashtakam बिल्वाष्टकम्

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments