Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहित राशीफल 16 ते 22 जुलै 2023

Webdunia
शनिवार, 15 जुलै 2023 (14:44 IST)
Weekly Horoscope  मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढेल. मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साह वाढेल. कौटुंबिक सदस्य मंडळीबरोबर असणारे वाद मिटतील व परिस्थिती पूर्वपदावर येईल. सर्वत्र यश दृष्टिक्षेपात राहील. अंतिम चरणात स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. संततीबाबद आनंदवार्ता येईल. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास सर्मथ स्थितीतच राहतील व अपेक्षापूर्ती होऊ शकेल.
 
वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पराक्रम अगर क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. दूर निवासी प्रिय व्यक्तींचे मनोनुकूल दूरध्वनी येतील व काळजी मिटेल. अंतिम चरणात पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक राहील. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरुपाचे सिद्ध होईल.
    
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व कर्ज व्यवहार प्रकरणे संथ गतीने कारवाईच्या मार्गावरच राहतील. आर्थिक व्यवहार जपून करणेच आवश्यक ठरेल व होणारे नुकसान टळेल. अंतिम चरणात कार्यसभोतालीन परिस्थिती अनुकूल व चांगली राहील. स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे गतिवान होऊन पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील. आपले सहकार्य इतरांना विशेष उपयोगीतेचे ठरू शकेल.
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे दडपण दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. मनातील कार्ययोजना प्रत्यक्ष कृतीत येतील. यशाचा मार्ग खुलाच राहील. अंतिम चरणात आर्थिक चढ-उतार निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयम ठेवणेच उचित ठरू शकेल.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात काही प्रमाणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहू नये. अन्यथा नुकसानकारक योग निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी आहे. त्यामुळे मनावरील काळजीचे सावट काही प्रमाणात कमी होण्याच्या दृष्टिक्षेपात राहील. महत्त्वपूर्ण स्वरुपाच्या घडामोडी व घटना घडतील.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरेंसारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. उधारी वसुलीचे संकेत व सूचना मिळतील. आर्थिक समस्या मिटेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे सावधानता ठेवूनच वाटचाल करणे आवश्यक व उचित ठरेल. भावी काळात होणारे नुकसान काही प्रमाणात टळेल. शांतता टिकून ठेवण्याचा प्रय▪जारी ठेवणे चांगले.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्र आघाडीवर राहील. नोकरीत वरिष्ठांबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती अनुकूल व चांगली राहील. सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश मिळून उत्साहवाढीस लागू शकेल. अंतिम चरणात जुन्या गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ हाती येईल. आर्थिक आवक समाधानकारक राहील. हातात पैसा खेळताच राहू शकेल. आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात महत्त्वपूर्ण स्वरुपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. सर्वत्र यश दृष्टिक्षेपात राहून काळजीचे सावट व दडपण दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल. अंतिम चरणात उद्योग क्षेत्रातील करार व्यवहार भावी काळाच्या दृष्टीने विशेष फायदेशीर ठरतील. नवीन कराराचे प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या अडचणी वाढतील. जवळचा प्रवास घडेल; परंतु तो दगदग व त्रास वाढविणारा ठरेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक ठरेल. होणारा त्रास कमी होईल. अंतिम चरणात धार्मिक कार्यक्रमानिमित्त प्रवास करावा लागेल. अपूर्ण व्यवहार कामांना गती मिळेल व यशस्वीतेच्या मार्गावर राहतील. मानसिक शांतता टिकून राहून उत्साहवर्धक स्थिती कायम राहील.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून फायदा घडेल. भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त राहील. काही बाबतीत दगदग निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. काळजीचे सावट वाढण्याची शक्यता आहे. अंतिम चरणात वाहन पिडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे, असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचे ठरेल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना घाईघाईने निर्णय घेणे अहितकारक ठरेल.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील व यशस्वीतेचा मार्ग खुलाच राहू शकेल. यश समोर दिसू लागेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करतील. अंतिम चरणात नियोजित कार्यक्रम रूपरेषेप्रमाणे होईल. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा, लाभप्रदच ठरू शकेल.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल व संततीबाबद आनंदवार्ता हाती येईल. आर्थिक समस्या व प्रश्न मनोनुकूलरीत्या मिटण्याच्या मार्गावर येतील. यश दृष्टिक्षेपातच राहील. अंतिम चरणात विरोधक मंडळीच्या कारवाया तूर्त थांबतील व विरोधक मंडळी सहकार्य करू लागतील. आरोग्याच्या बहुतेक समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. सर्वत्र अपेक्षेइतके यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

रविवारी करा आरती सूर्याची

दशरथ कृत शनि स्तोत्र

आरती शनिवारची

तुकाराम महाराज पालखी आज निघणार

सर्व पहा

नक्की वाचा

बेलग्रेडमध्ये इस्रायली दूतावासाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यावर हल्ला, गोळीबारात हल्लेखोर ठार

विम्बल्डनमध्ये सुमित नागलला कठीण ड्रॉ, पहिल्या फेरीत या खेळाडूशी सामना होईल

जो बायडन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मागे घ्यायला लागू शकते का?

टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता, गोलंदाजांनी पराभवाच्या जबड्यातून विजयश्री खेचून आणली

IND vs SA Final :भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

पुढील लेख
Show comments