Marathi Biodata Maker

दैनिक राशीफल 09.06.2024

Webdunia
शनिवार, 8 जून 2024 (21:40 IST)
मेष : धार्मिक स्थळांना भेटी द्याल. आगंतुक पाहुणो येण्याची शक्यता राहते. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. नवनिर्मीतीचा आनंद घ्याल. कवि, कलाकारांना चांगल्या संधींचा लाभ घेता येईल
 
वृषभ : व्यावसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. धनस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आर्तिक उन्नती करणारे राहील. संततीची उन्नती होईल. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश लाभेल
 
मिथुन : तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. आपल्याच राशीतून होणारे चंद्राचे भ्रमणामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल.
 
कर्क : प्रयत्नांती परमेश्‍वर या उक्तीचा प्रत्यय येईल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उंची वस्त्रालंकांरांची खरेदी कराल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. व्ययस्थ चंद्राचे भ्रमण कामानिमित्त दूरचे प्रवास घडवून आणणारे राहील.
 
सिहं : सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. लाभस्थ चंद्राचे भ्रमण तरु.णांच्या कौशल्याला चांगला वाव देईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल.
 
कन्या : एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. आकर्षक भेटवस्तू मिळतील. दशमस्थ चंद्राचे भ्रमण व्यवसाय उद्योगातून अभिनव तंत्र वापरल्यामुळे यश येईल.
 
तूळ : व्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल.
 
वृश्चिक : परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. अष्टमस्थ चंद्राभ्रमणामुळे प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. 
 
धनू : विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. व्यवसायात नवे तंत्र अंमलात आणू शकाल. आपल्या कामाच्या पूर्ततेसाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहू नका. वैराण वाळवंटाची वाट संपत आल्याची चिन्हे दिसून येतील. सामाजिक पत उंचावेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. 
 
मकर : विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. व्यवसायात नवे तंत्र अंमलात आणू शकाल. आपल्या कामाच्या पूर्ततेसाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहू नका. वैराण वाळवंटाची वाट संपत आल्याची चिन्हे दिसून येतील. सामाजिक पत उंचावेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल.
 
कुंभ : जुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. करमणूकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल.
 
मीन : कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार्‍या घटना घडतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शुक्रवारी भालचंद्र संकष्टी चतुर्थी, पूजा विधी आणि चंद्रोदय वेळ जाणून घ्या

संत तुकाराम महाराज मंदिर श्री तीर्थक्षेत्र देहू

Tukaram Beej 2026 Messages in Marathi तुकाराम बीज निमित्त संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना त्रिवार वंदन

आरती गुरुवारची

Sant Tukaram Beej 2026 संत तुकाराम बीज संपूर्ण माहिती आणि महत्व

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments