Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशिफल 22 जानेवारी 2024 ते 28 जानेवारी 2024

साप्ताहिक राशिफल 22  जानेवारी 2024 ते 28 जानेवारी  2024
Webdunia
शनिवार, 20 जानेवारी 2024 (13:50 IST)
मेष : नोकरी व्यवसायात आपले तत्व सोडून कोणतेही काम करु नका. नवीन करार करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करणे तूर्त टाळावे. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्‍या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल. आपले काम दुसर्‍यावर सोपवू नका. 
 
वृषभ : लेखक, साहित्यिक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. आपली सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा उंचावेल. व्यवसाय उद्योगातील उधारी उसनवारी वसूल होईल. आपल्या वाक्चातुर्य़ाने दुसर्‍यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. नोकरीत पदोन्नती होईल. संतांचा सहवास लाभेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. धाडसी निर्णय घेतले जातील.  
 
मिथुन : कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी वाटेल. घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. प्रतिस्पध्र्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या अनिश्‍चितता जाणवेल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना नांवलौकिक मिळेल. त्यांच्या कार्याचा गौरव केला जाईल. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागणार.   
 
कर्क : प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकेवर काढतील. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. आपले आवडते छंद पासण्यासाठी वेळ देता येईल. व्यवसायत उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. व्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल.जोडीदाराची पदोन्नती होईल. जनसंपर्कातून लाभ होतील. नवोदित कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे योग येतील.  
 
सिंह : पूर्वी भावंडांशी झालेले मतभेद आपण गोड बोलून नाहिसे कराल. आपले अंदाज अचूक ठरतील. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद लुटाल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. गुंतवणूकीतून लाभ होतील. जूनी व्यावसायिक येणी वसूल होतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. घराण्याच्या स्थावर मालमत्तेतून काही आर्थिक फायदा होईल. नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. वाहन-वास्तूचे योग येतील. प्रतिष्ठीत व्यक्तीचे घराला पाय लागतील.  
 
कन्या : कौटुंबिक सौख्य लाभेल. आपल्या कर्तृत्त्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. इच्छापूर्ती होईल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. महिलांना बदलाची नितांत गरज भासेल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. कवि, कलाकार, गायक, लेखक यांना चांगल्या संधी चालून येतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. उत्तरार्धात षष्ठस्थ मंगळामुळे उष्णतेच्य विकारांचा त्रास जाणवेल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.  
 
तूळ : बौद्धीक व कला क्षेत्रात चांगली संधी लाभेल. व्यवसायात नवीन योजना राबवू शकाल. अनेक कामातून सफलता मिळणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. मोठय़ा यशासाठी प्रयत्न करावे लागतील. मार्गदर्शन घडेल. एखाद्या चांगल्या घटनेने मनोबल वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. अडचणी कमी होतील. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातून आत्मउन्नती करता येईल. पराक्रमातील मंगळामुळे अंगी धडाडी येईल. कर्तुत्वशक्ती वाढेल्याने धाडसी कामे कराल.  
 
वृश्चिक :  जुने मित्र भेटतील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. कल्पनाशक्तीला वाव देणार्‍या घटना घडतील. सरकारी कामात योग्य प्रगती होईल. उत्तरार्दात जवळचे प्रवास सुखाचे करणारा आहे. भावाबहिणींशी संबंध चांगले राहतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.  
 
धनु : प्रवासातून कार्यसिद्धी होईल. आपण आपली बाजू प्रभावीपणे मांडल्यामुळेच आपल्या मतांचा आदर केला जाईल. मनस्वास्थ लाभेल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकाराल. अधिकारावर असणार्‍या स्त्री व्यक्तीकडून आपले लांबलेले काम होईल. नोकरी-व्यवसायात स्थिरस्थावरता येईल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. आपली आर्थिक बाजू बळकट करणार्‍या घटना घडतील. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. अनावश्यक खर्च उद्भवतील.  
 
मकर : वरिष्ठांच्या सल्ल्यानेच कामे मार्गी लावा. नोकरीत मनासा.रख्या घटना घडतील. उत्साह वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभतील. कला, साहित्य क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. सरकारी दरबारी रेंगाळलेल्या कामात यश मिळेल. नवीन ओळखी होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कामाचे चांगले नियोजन कराल. धावपळीचे, कष्टाचे सार्थक होईल. नव्या कामात अपेक्षित यश मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल.  
 
कुंभ : व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविता येतील. आशावादी धोरण स्वीकाराल.मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत येतील. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. नवोदित कलाकारांना सुसंधी लाभतील. कला, साहित्य क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक आवक वाढेल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.  
 
मीन : व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविता येतील. आशावादी धोरण स्वीकाराल.मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत येतील. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. नवोदित कलाकारांना सुसंधी लाभतील. कला, साहित्य क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक आवक वाढेल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

मीराबाईची कहाणी

Gudi Padwa 2025 Wishes in Marathi गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी

Gudi Padwa Special श्रीखंड पुरी रेसिपी

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

पुढील लेख