गणेश विसर्जन मिरवणूक आणि अयोध्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अयोध्येचा निकाल शांततेने पाळावा असे आवाहन उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
नाशिक येथे झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी हे आदेश दिले आहेत. गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान गणेश भक्तांनी पोलिसांना सहकार्य करावे असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
येत्या 24 तारखेला अयोध्येचा निकाल लागत असल्याने कोणीही अधिकारी व कर्मचारी यांनी येत्या 8 दिवसांत मुख्यालय सोडून जाऊ नये असे निर्देशही भुजबळ यांनी या बैठकीत दिले आहेत.