अखेर अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील याचिकेसंदर्भातील सुनावणी पुढे ढकलण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिले आहेत. आता या प्रकरणाची सुनावणी 28 तारखेला होणार आहे.
रमेशचंद्र त्रिपाठी यांनी निकाल जाहीर करु नये यासाठी याचिका दाखल केली होती. अलाहाबाद न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर त्रिपाठी यांनी दिल्लीत सुप्रीम कोर्टाकडे या संदर्भात याचिका दाखल केली होती.
आज या प्रकरणी न्यायालयाने निर्णय दिला. मध्यस्थांच्या माध्यमातून या वादग्रस्त प्रकरणाचा तोडगा काढण्यात यावा यासाठी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.