Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इस्लामी राजवटीतील ‘आयोध्या’

नितिन फलटणकर

Webdunia
मंगळवार, 21 सप्टेंबर 2010 (14:08 IST)
इस्लाम धर्माच्या निर्मितीनंतर साधारण इ.स. सन 711 मध्ये मुहोंम्मद बिन कासिमने भारतात प्रथम हल्ला चढवला होता. या दरम्यान भारतातील राजे बलाढ्य मानले जात. हा हल्ला परतावून लावण्‍यात भारतीय राजांना यश आल्यानंतर सुमारे अडीचशे ते तिनशे वर्ष पुन्हा इस्लामी शासनकर्त्यांची भारतावर हल्ला करण्‍याची हिंमत झाली नाही.

या काळात भारतात हिंदू शासनकर्त्यांचे राज्य होते. यानंतर साधारण 711 ते 1857 वर्षांपर्यंत भारतात इस्लामी शासनकर्त्यांनी हैदोस घातला. अनेक हिंदू राजांनी त्यांचा कडवा प्रतिकार करण्‍याचा प्रयत्न केला. अनेकांना यश आले तर अनेकांनी बलिदान दिले.

सर्वात क्रूर इस्लामी आक्रमक होता, तो मोहंम्मद गझनी. त्याला मूर्तिभंजक म्हणूनही ओळखले जाते. त्याने आपल्या काळात अनेक हिंदू मंदीरं पाडली. त्यातील मूर्ति त्यानो तोडल्या.

गझनीने प्रसिद्ध सोमनाथाचे मंदीर पाडण्‍यासाठी खटाटोप चालवला होता. अनेक हिंदू राजांनी एकत्र येत या काळात त्याचा प्रतिकार केला होता. यानंतर त्याने भारतातील अनेक मंदीरात मोडतोड करण्‍यास सुरुवात केली.

आयोध्येचा इतिहास पहाता, अनेक मुस्लिम शासनकर्त्यांनी आयोध्येवर हल्ला करत रामजन्मभूमीवर आपला ताबा मिळवण्‍याचा प्रयत्न केला. इतिहासातील दाखल्यांनुसार बाबरने आयोध्येत मंदीराच्या जागी मशिद बांधली.

तारिखे बाबरी नावाच्या ग्रंथात बाबरच्या काळात आयोध्येसह अनेक मंदीरं पाडत तिथे मंदीरं बांधल्याचा उल्लेख आढळतो. ऐतिहासिक उल्लेखांनुसार आयोध्येत मुस्लिम शासनकर्ते तसेच हिंदू राजे व साधूंमध्ये सुमारे 75 ते 76 लढाया झाल्या आहेत.

यात बाबरच्या काळात चार, अकबराच्या काळात 20,औरंगजेबच्या काळात 30, हमायूंच्या काळात 10, नवाब सआदत अलीच्या काळात 5, नवाब नसिरुद्दीनच्या काळात 3,मसूद सालरच्या काळात 2 लढाया अशा एकूण 76 वर लढाया आयोध्येसाठी लढल्या गेल्याचा उल्लेख विविध धर्मग्रंथ तसेच ऐतिहासिक पुस्तकांमध्ये आहे.

या लढायांमध्ये अनेकदा मुस्लिम शासनकर्त्यांना मार खावा लागला आहे, तर अनेकदा हिंदू शासनकर्त्यांचा पराभव झाल्याचा उल्लेख आहे. पहिला मुस्लिम शासक भारतात दाखल झाल्यापासून ते आजतागायत आयोध्येतील मंदीराविषयीचा वाद कायम आहे.
सर्व पहा

अयोध्या विशेष

अयोध्येतील राम मंदिर कसे असणार, जाणून घ्या

श्रीरामाचा जन्म अयोध्येतच का झाला?

रामाचे चित्र असलेली खास साडी सुरतहून अयोध्येला पाठवली जाणार

अयोध्या VS लंका, राम आणि रावणाची नगरी जाणून घ्या

अरुण योगीराज यांनी कोरलेली 'राम लल्ला'च्या मूर्तीची निवड

Show comments