Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंगोलियन शासनकर्ता ‘बाबर’

नितिन फलटणकर

Webdunia
बुधवार, 29 सप्टेंबर 2010 (10:49 IST)
आयोध्येतील वादग्रस्त जागी मुगल शासनकर्ता जहिर उद-दि मुहंम्मद अर्थात बाबरने इ.स. 1527 मध्ये बाबरी मशिद बांधली. बाबर भारतातील मुगल वंशाचा संस्थापक मानला जातो. 14 फेब्रुवारी 1483 साली त्याचा जन्म झाला होता.


बाबरचा जन्म उज्बेकिस्तानातील अंदिजन नावाच्या शहरात झाला होता. त्याचे वडील उमर शेख मिर्झा या भागातील शासक मानले जात.

बाबर हा मूळ मंगोलियन वंशाचा होता. त्याचा संबंध येतील बर्लास कबिल्याशी होता. कालांतराने त्याच्या पुर्वजांनी इस्लाम धर्माचा स्विकार केला.

बाबरची मातृभाषा चागताई (फारसी) होती.याच भाषेत त्याने एक ‘बाबरनामा’ नावाने ग्रंथही लिहिला आहे.

आपल्या वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच बाबरला वडीलांच्या जागी फरगाना भागातील शासक म्हणून नियुक्त करण्‍यात आले. त्याच्या काकांनी त्याच्या बालवयाचा फायदा घेत येथून त्याला हाकलून लावले. यानंतर काहीकाळ बाबर भूमिगत झाला होता.

आल्या नातेवाईकांचा बसला घेण्‍यासाठी त्याने पुन्हा सैन्य निर्मिती सुरु केली. 1504 मध्ये त्याने काबुलवर आपली सत्ता प्रस्थापित केली. यानंतर बाबरने भारताकडे आपला मोर्चा वळवला.

त्याने 1526 मध्ये प्रथम दिल्लीवर मुगल शासन स्थापन केले. यानंतर त्याने भारतातील मंदीरांवर आक्रमण करण्‍यास सुरुवात केली. बाबर हा मूर्तिभंजक मानला जात. तो स्वत:ला ‘बुत्शिकन’ व ‘गाझी’ म्हणत. याचा अर्थ मूर्ति तोडणारा.

त्याने आयोध्येतील राममंदीर तोडत तेथे बाबरी मशिद बांधण्‍याचा चंग बांधला होता. यावेळी अनेक हिंदू राजांनी त्याचा कडवा प्रतिकार केला.

अखेर 1527 मध्ये त्याने बाबरी मशिद या वादग्रस्त जागेवर बांधली. बाबरी मशिद शिल्प व स्थापत्य कलेचा उत्तम नमूना आहे.

या मशिदीची खासियत म्हणजे यात हळू आवाजात केलेले संभाषणही किमान 200 मिटर अंतरावर आत कोठेही ऐकू येते असे बोलले जाते.

मशिदीचे तीन घुमट आहेत. यापैकी दोन घुमट 1992 मध्ये कार सेवकांनी पाडले. न्यायालयाच्या आदेशांनंतर आजतागायत या भागात जैसे थे परिस्थिती आहे.

साधारण 1940 पर्यंत या जागेला मशिद-ए-जन्मस्थान या नावाने ओळखले जात होते. हे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट असल्याने याचा वाद कायम आहे.
सर्व पहा

अयोध्या विशेष

अयोध्येतील राम मंदिर कसे असणार, जाणून घ्या

श्रीरामाचा जन्म अयोध्येतच का झाला?

रामाचे चित्र असलेली खास साडी सुरतहून अयोध्येला पाठवली जाणार

अयोध्या VS लंका, राम आणि रावणाची नगरी जाणून घ्या

अरुण योगीराज यांनी कोरलेली 'राम लल्ला'च्या मूर्तीची निवड

Show comments