Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) संस्था काय काम करते ?

Webdunia
शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (14:13 IST)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) संस्था काय काम करते ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्याचवेळी बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. असे वृत्त प्रसारित झाले आहे तीमुळे आता बार्टी हि संस्था चर्चेत आली आहे जाणून घेऊ की हि संस्था काय काम करते.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेची स्थापना शासननिर्णय क्र. युटीए - १०७८/डी-२५ दिनांक २२ डिसेंबर १९७८ अन्वये मुंबई इथे करण्यात आली. या विचारपीठाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था करण्यात आले. हि संस्था मुंबईहून सन १९८७ पुणे इथे स्थलांतरित करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबर २००८ रोजी शासनाने या संस्थेला स्वायत्तेचा दर्जा प्रदान करण्यात आले आहे.
 
संस्थेचे कार्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समानतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या संबंधाने संशोधन आणि प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, सामाजिक न्याय व समता या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुल्यांवर काम करते. संस्थेत अनुसूचित जातीसाठी अनेक प्रकल्प राबविले जातात त्यात कौशल्य विकास, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम, समतादूत, युवा नेतृत्व, संशोधन, ग्रंथालय स्पर्धा परीक्षाची संधी आणि व्यावसायिक प्रशिक्षण, जात वैधता प्रमाणपत्र आणि त्याचे स्कॅनिंग आणि डिजिटाइझशन असे विविध प्रकल्प आहेत.या प्रकल्पांच्या माध्यमातून बार्टी संस्था अनुसूचित जातीच्या युवकांमध्ये आत्मविश्वास, माहिती आणि ज्ञान वाढवणे याचे काम करते. बार्टी पुणे या संस्थेने अनुसूचित जातीच्या बेरोजगार युवती व युवकांना कौशल्य पुर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोगारक्षम बनवले आहे.
 
सामाजिक न्याय व समता या मुल्यांसाठी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांची स्वायंत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी), ही कटिबद्ध आहे.
R S
विभागाची माहिती
संशोधन विभाग
उद्देश :- सामाजिक न्याय व समतेच्या दृष्टीने विविध विषयांचे व जातीसंदर्भातील माहिती संकलन, विश्लेषण व अहवाल तयार करून प्रसिद्ध करण्याचे कार्य संशोधन विभागामार्फत केले जाते. समता, सामाजिक न्याय, जातीय दुर्भावनांचे उच्चाटन, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, नैतिक मुल्ये, राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा, महिलांसंदर्भातील विषय, भेदभावाचे उच्चाटन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील विविध पैलू, भारतातील विविध थोर समाज सुधारक जसे जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज वगैरे अशा विविध विषयांवर संशोधनाच्या माध्यमातून अभ्यास करून शासनाच्या धोरणात्मक पातळीवर शिफारसीसह अहवाल सादर करणे.
 
पूर्ण झालेल्या प्रकल्पांपैकी राज्य शासनास सादर करण्यात आलेले प्रकल्प
महाराष्ट्र राज्यातील धोबी समाजाचा अस्पृश्यतेसंबंधी सामाजिक स्थितीचा अभ्यास. (1996)
विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या संदर्भात इदाते अहवाल (1999)
हिंदू खाटिक समाजाची सद्यस्थिती.
सफाई कर्मचाऱ्यांचा वास्तववादी विश्लेषणात्मक अभ्यास
पुणे जिल्ह्यातील मांग गारुडी समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण
मादिगा समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण
कैकाडी समाजाचे क्षेत्रबंधन उठवून विमुक्त जातीतील कैकाडी समाजाचा समावेश अनुसूचित जाती मध्ये करण्याबाबत.
होलार समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सद्यस्थिती.
गोसावी समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण
 
पूर्ण झालेले प्रकल्प
50% पेक्षा जास्त अनु जातींची लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमधील सोयी सुविधांचे सर्वेक्षण.
 
संशोधन एकत्रीकरण प्रकल्प – 1 प्रकल्प पूर्ण - Educational and Socio-economic status of Gatai Charmkars in Aurangabad and Nashik.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान अर्थशास्त्रज्ञ – 3 प्रकल्प पूर्ण 1. Dr, B.R. Ambedkar Economic Thoughts to the Agrarian Distress and Farmer Suicide in Maharashtra 2. Collective Farming and contemporary challenge 3. Economic thoughts of Dr. Babasaheb Ambedkar and its Relevance in the world economic Context.
 
पारधी अहवाल : टाटा समाज सेवा संस्था यांच्यामार्फत सदर अहवाल पूर्ण करण्यात आला आहे.
सद्यस्थितीमध्ये सुरु असलेले प्रकल्प
 
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातींच्या सामाजिक, आर्थिक शैक्षणिक विकासाबाबत बेंचमार्क सर्वेक्षण
बंगाली नमोक्षुद्र समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण
मेहतर – वाल्मिकी समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अभ्यास
वडार समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अभ्यास
रहाटेनगर नागपूर येथील मांग गारुडी समाजाचे सामाजिक, आर्थिक शैक्षणिक स्थितीचे सर्वेक्षण
आंतरजातीय विवाह विषयक कृती संशोधन
R S
संशोधन अहवाल
होलार समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सद्यस्थिती (Click Here to download)
गोसावी समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण (Click Here to download)
50% पेक्षा जास्त अनु जातींची लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमधील सोयी सुविधांचे सर्वेक्षण (Click Here to download)
महाराष्ट्र राज्यातील धोबी समाजाचा अस्पृश्यतेसंबंधी सामाजिक स्थितीचा अभ्यास. (1996) (Click Here to download)
हिंदू खाटिक समाजाची सद्यस्थिती (Click Here to download)
पुणे जिल्ह्यातील मांग गारुडी समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण (Click Here to download)
मादिगा समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण (Click Here to download)
कैकाडी समाजाचे क्षेत्रबंधन उठवून विमुक्त जातीतील कैकाडी समाजाचा समावेश अनुसूचित जाती मध्ये करण्याबाबत (Click Here to download)
खालील पैकी विविध प्रशिक्षण कार्यक्रम विभागाच्या विचाराधीन आहेत::
 
मूल्यमापन शाखा
शाखेची माहिती -
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय दुर्बल घटकांसाठी विशेष घटक योजनेंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात.
दि.07/12/2012 रोजीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत विषय क्रमांक 6 मान्य झाल्यानुसार त्यापैकी काही महत्वाच्या योजनांचे मूल्यमापन या संस्थेमार्फत करण्यात येते. या योजनांचा मूल्यमापन अहवाल शासनास धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त होतो.
 
मूल्यमापनाची उद्दिष्टे
योजना /कार्यक्रमाचे मुख्य उद्देश कितपत  साध्य झाले आहेत ते पाहणे.
योजनेचे लाभार्थी लक्ष गटातील आहे का ते पाहणे.
योजनेअंतर्गत जे सहाय्य दिले जाते ते पुरेसे आहे का ते पाहणे.
योजना राबविल्यामुळे अपेक्षित परिणाम  झाला आहे का ते पाहणे.
योजना अंमलबजावणीमधील दोष, उणिवा, त्रुटी शोधणे व त्यावरील सुधारणा सुचविणे.
 
मूल्यमापनाची कार्यपद्धती
योजनेविषयीची प्राथमिक माहिती (Primary Data Collection) सर्व जिल्हयांकडून प्राप्त करून घेतली जाते.
नमुना निवड करणे (Sampling) :- प्राथमिक माहितीच्या आधारे लाभार्थी निवड केली जाते.
प्रपत्र (Questionnaire) तयार करणे :- योजनेच्या / मूल्यमापनाच्या उद्दष्टिनुसार प्रपत्र तयार करण्यात येते.
पथदर्शी सर्वेक्षण (Pilot Survay) :- तयार केलेल्या प्रपत्रातील माहितीची चाचणी घेतली जाते.
प्रपत्र अंतिम करणे :- पथदर्शी सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या सुचनेनुसार प्रपत्र अंतिम करण्यात येते.
अंतिम प्रपत्रामध्ये माहितीचे संकलन :- निवडलेल्या योजना/ लाभार्थी /संस्था यांची क्षेत्रीय पाहणी करून माहिती संकलित केली जाते.
माहिती नोंदणी :- प्रपत्रातील माहितीला संकेतांक देऊन माहितीची नोंदणी संगणकावर करण्यात येते.
माहितीचे पृथ्थ‍:करण :- नोंदविलेल्या माहितीचे पृथ्थ‍:करण व तक्तीकरण करण्यात येते.
अहवाल लेखन :- पृथ्थ:करण व तक्तीकरणाच्या आधारे अहवाल लेखन करण्यात येते आणि सदर अंतिम अहवाल मा. महासंचालक बार्टी, पुणे यांच्या मंजूरीस सादर करण्यात येतो.
मा. महासंचालक यांचे मान्यतेनंतर मूल्यमापन अहवाल शासनास व मा. आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय यांना सादर करण्यात येतो.
मुल्यमापन कक्षामार्फत पूर्ण झालेले मूल्यमापन अहवाल
रमाई घरकुल योजना (ग्रामीण विभाग)
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
अनुसूचित जातीच्या 50 मुला-मुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशातील शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना
अनुसूचित जातीच्या औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय अनुदानित वस्तीगृहांना सहाय्य अनुदान योजना
अनुसचित जाती व नवबौध्द घटकांतील उमेदवारांना मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना
विजाभज, इमाव व विमाप्र घटकांतील उमेदवारांना मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना
आश्रमशाळा चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान योजना
गटई कारागीरांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे योजना
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना
 
मुल्यमापन सुरू असलेल्या योजना
अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना
रमाई आवास योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेबाबत जिल्हानिहाय माहिती संकलन करून धोरणात्मक अहवाल सादर करणे
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्याना विद्यावेतन योजना
बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मूल्यमापन करणे. (अधिछात्रवृत्ती योजना BANRF)
ऊसतोड कामगारांना आधुनिक उपकरणे उपलब्ध होणेबाबत
 
भविष्यात मुल्यमापनासाठीच्या योजना
शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना
बार्टीच्या योजनांचे मूल्यमापन करणे
विशेष घटक योजनेअंतर्गत कृषी खात्याच्या योजना
इतर विभागाच्या योजनांचे मुल्यमापन करणे
शासकीय अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण संस्था
About Projects संस्थेमार्फत खालील प्रकारचे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केले जातात.
 
पायाभुत प्रशिक्षण कार्यशाळा
उजळणी प्रशिक्षण
नविन विषयाची ओळख प्रशिक्षण
पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण
तांत्रिक प्रशिक्षण
R S
Project 1
मा. आयुक्त, समाज कल्याण यांच्या आस्थापनेवरी सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या क्षमतावृध्दीसाठी आवश्यक्तेनूसार पायाभूत, उजळणी, पदोन्नतीनंतर प्रशिक्षण कार्यशाळा.
Project 2
अपंग कल्याण, आयुक्तालय व विजाभज कल्याण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या क्षमतावृध्दीसाठी आवश्यक्तेनूसार पायाभूत, उजळणी, पदोन्नतीनंतर प्रशिक्षण कार्यशाळा.
Project 3
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका व महानगरपालिकेतील मागासवर्गीय लोकप्रतिनिधींना सामाजिक न्याय विभागातील विविध योजनांच्या महितीकरीता प्रशिक्षण देणे.
Project 4
जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे.
 
Achievements
सन 2012-13 ते 2011-22 पर्यंत एकुण 145 उजळणी व पायाभूत कार्यशाळा घेण्यात आल्या असून, 6,828 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यामध्ये समाज कल्याण, अपंग कल्याण व विजाभज कल्याण संचालनालयाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक गृहपाल, समाजकल्याण निरिक्षक, सहाय्यक शिक्षक व मुख्याध्यापक तसेच मतीमंद बालगृह कर्मचारी, शिपाई यांचा समावेश आहे.
 
जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग विभाग जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग
विभागाची माहिती
महाराष्ट्र अधिनियम क्र.XXIII व्या अंतर्गत  २००१ आणि २०१२ अन्वये सर्व जातीचे प्रमाणपत्र छाननी करणे , समित्यांवर देखरेख ठेवणे  आणि समन्वय साधणे, यासाठी  BARTI ने २९.०८.२०१२ च्या जी.आर.नुसार  महासंचालकाची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. तो समित्यांच्या कामाचा आढावा घेणे,
आर्थिक  सहाय्यकाची तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविणे ,सदस्यांसाठी कार्यशाळा व  प्रशिक्षण व्यवस्था करणे ,सक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांना जातीचे प्रमाणपत्र देणे ही कामे'करतो.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

पुढील लेख
Show comments