Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अस्मितेचा सूर्य : डॉ. आंबेडकर

Webdunia
बाबा, तूच आम्हाला लेखणी दिली, 
भावना दिल्या, करुणा दिल्या, 
विवेक प्रेरणा-धैर्य दिले 
निष्ठा दिल्या आणि
दिशाही दिल!
 
तुझ्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानाने 
असंख्य शब्द निर्मात्यांना  
जाग आली
आत्मभान घेऊन जगाच्या शाळेत
वादळवारे झेलून
स्वंतेजाने उभी राहिली ।
 
प्रस्थापित व्यवस्थेनं दबलेल्या 
वांझ शब्दाला विद्रोहाची धार आली
कळू लागल व्यथांच्या वेदना
अन् वास्तव जीवनाचं अस्तित्व
बाबा, तुझा आश्वासक हात
आमच्या पाठीवर टाकून
तू प्रहार केलेस लेखणीने
मानवाचे अस्तित्व नाकारणार्‍या अमानवतेला, अमानुषतेला 
संस्कृतीच्या पिढीजात ठेकेदारांना
शोधून ठेचून
शोषणाचे पाट फोडून
पुरातन मूल्यांना जाळून
विषमतेच्या भिंतीला गाडून 
स्वातंत्र्य-समता-बंधुत्व-न्याय  
भारतीय संविधानात नोंद केलीस ।
 
तू दिलास आविष्कार स्वाभिमानाचा
तू दिलेस सजीवत्व नाकारलेल्यांना  
तू रोविलेस निशाण समतेचे
तू अंधाराला छेदून
व्यवस्‍थेला भेदून
प्रज्ञेचे, करुणेचे दिवे पेटवून
उजेडाचं दान देऊन
तू अस्मितेचा सूर्य झालास ।
 
अंधारलेली गावे उजेडात आली
गावकूस आणि 
वेस कालबाह्य झाली !
मुक्यांना बोलतं करून
तू मूकनायक झालास
बाबा, आता व्हाला हवं संघटित
तुझा अर्ध्यावर राहिलेला
क्रांती-प्रगतीचा रथ
तुझी शिरसावंद्य आज्ञा
आसासह चाक पूर्ण फिरविण्याची  
आम्ही घेत आहोत प्रतिज्ञा
तथागताच्या शीलाचं तोरण बांधून
प्रज्ञेचं गीत गाऊन
करुणेची जेत पेटवून
निळ्या किरणांच्या साक्षीने
तुझ चरणी फुले वाहून
 
फुले वाहून !..
 
अशोक जानराव
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

वृद्ध महिलेची 2.3 कोटी रुपयांची फसवणूक एकाला अटक

भाजपने महाराष्ट्रासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती केली, निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी उद्या मुंबईला जाणार

LIVE: श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

1 कोटींची चोरी करणाऱ्या चोराला कुत्र्याने पकडले, पोलिसांचा मोठा खुलासा

मुंबईत हिट अँड रनमध्ये शिक्षिकाचा मृत्यू, 2 वर्षांची मुलगी बचावली

पुढील लेख
Show comments