Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'मेरी पार्टी में मैं हू अकेला' आठवलेंच्या कवितांनी राज्यसभेत हसू अनावर

Webdunia
बुधवार, 7 डिसेंबर 2022 (15:21 IST)
"तुम्ही मला नेहमी कविता ऐकवण्याबाबत सांगायचा. मात्र, तुम्हाला माझी कविता ऐकायची असेल, तर मला बोलू द्यावं लागेल", असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले केलं आहे.
 
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांच्या अभिनंदन आणि स्वागतपर भाषण केलं.
 
आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ही कवितेनेच केली. त्यांच्या भाषणादरम्यान नेहमीप्रमाणे हशा पिकला.
 
ते म्हणाले,
 
“आदरणीय महोदय,
 
मैं तो अन्याय के खिलाफ लढा हूँ,
 
इसलिए आपको बधाई देने के लिए खडा हूँ,
 
आपका अनुभव बहुतही बडा है,
 
इसलिए आपने संघर्ष का पहाड चढा है,
 
मेरे पार्टी का मैं हू अकेला,
 
लेकीन मेरे हाथ में है संविधान का पेला,
 
मैं तो हूँ आपका सच्चा चेला,
 
 मुझे मत छोडो अकेला.
 
जिन्होंने उपराष्ट्रपती का सर किया है गड,
 
उनका नाम है धनकड
 
हमें मिलकर उखाड देनी है विषमता की जड,
 
इसमें जरूर सफल होंगे आदरणीय धनकड
 
हाऊस में जो सदस्य करेंगे फॅक्शन,
 
उनके उपर होनी चाहिए कडी अॅक्शन
 
हमें तो मजबूत करना हैं भारत नेशन,
 
क्योंकी हंगामा करने की हमें नही चाहिए फॅशन”
 
आठवले यांच्या कवितेला उपस्थित खासदारांनीही चांगला प्रतिसाद दिला. ते आपली कविता सादर करत असताना इतर खासदार त्यांना अधूनमधून दाद देत होते.
 
रामदास आठवले पुढे म्हणाले, “तुम्ही मोठा संघर्ष करून याठिकाणी पोहोचला आहात, गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा ते इथपर्यंत तुम्ही उच्च पदापर्यंत आला आहात. तुमचा अनुभव आणि संघर्ष मोठा आहे. तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे.
 
पश्चिम बंगालमध्ये काम करणं अवघड होतं. पण तुम्ही ते आव्हान लीलया पेललं. बंगालमध्ये तुम्ही चांगलं काम केलं म्हणूनच तुम्ही इथेपर्यंत पोहोचू शकला आहात. तिथे तुम्ही चांगलं काम केलं नसतं, तर कदाचित तुम्हाला हे पद मिळणं अवघड होतं.
 
'सगळ्या पक्षात मित्रमंडळी'
“पश्चिम बंगाल आपलंच आहे. तिथले नेतेही आपलेच आहेत. कोणतंही राज्य असो, विविध पक्षांचं सरकार स्थापन होत असतं.
 
मीसुद्धा तीन वेळा खासदार राहिलो आहे. शिर्डीत मी हरलो, मात्र मी घरी बसलो नाही.
 
मी फिरत होतो. माझी मित्रमंडळी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षातही आहेत. आता मी भाजपसोबत आलो आहे.
 
मला शिर्डीमध्ये हरवण्यात आलं म्हणूनच मी भाजपसोबत आलो आहे. मला शिर्डीत पाडलं गेलं, मंत्रीही बनवण्यात आलं नाही. मग तिथे राहून काय करू, म्हणून मला काँग्रेसची साथ सोडावी लागली,” असं आठवले यांनी म्हटलं.
 
माझ्या कविता ऐकायच्या असतील तर...
“नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकासमध्ये एक प्रकाश दिसत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मी निर्णय घेतला. मी बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी आहे. आपण सत्तेत आलं पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. माझा पक्ष एकटा सत्तेत येऊ शकत नाही.
 
"कुणासोबत तरी मिळूनच सत्तेत येऊ शकतो. माझ्या पक्षाचा एकही सदस्य लोकसभेत नाही, तरीसुद्धा तुम्ही मंत्री कसे काय, असं मला लोक विचारत असतात. मी म्हटलं, याचं उत्तर तुम्ही पंतप्रधानांना जाऊन विचारा, असंही त्यांनी म्हटलं.
 
“मी एकटा आहे, पण माझ्या पक्षाचे कार्यकर्ते देशभरात सर्वत्र आहेत. ईशान्येच्या राज्यांतही माझा पक्ष आहे. तुम्ही खूप चांगला आहात, हे मला माहीत आहे, म्हणून तुम्ही मला बोलण्याची संधी दिली पाहिजे. तुम्ही मला नेहमी कविता ऐकवण्याबाबत सांगायचा. आज तुम्हाला माझी कविता ऐकायची असेल, तर मला बोलू द्यावं लागेल.
 
तुम्ही विरोधी पक्षांनाही गौंधळ करण्याची संधी द्या. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सोबतच तुम्ही मला बोलण्याची संधी दिली पाहिजे.
 
त्यामुळे या सभागृहाच्या सर्वोच्च पदावर तुम्ही गेल्याने तुमचं अभिनंदन,” असं आठवले यांनी म्हटलं.
Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments