Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना : गरीब देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग तपासण्यासाठी 15 मिनिटांत निकाल देणारी चाचणी

Webdunia
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (12:53 IST)
कोव्हिड-19 चं निदान काही मिनिटांत करणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण कमी आणि मध्यम उत्पन्न देशांमध्ये वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) पावलं उचलली आहेत.
 
WHO कडून कमी आणि मध्यम उत्पन्न देशांमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट मोठ्या संख्येनं करण्यात येणार आहेत.
 
डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा यांची कमतरता असलेल्या गरीब देशांसाठी पाच डॉलर्समध्ये होऊ शकणारी ही टेस्ट कोव्हिड-19 च्या प्रादूर्भाव किती वेगानं होत आहे, हे जाणून घेण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
 
येत्या सहा महिन्यात 120 दशलक्ष टेस्ट करण्यासंबंधी बोलणी झाली असल्याचं WHO नं स्पष्ट केलं आहे. हे पाऊल कोरोना संसर्ग रोखण्यासंदर्भात मैलाचा दगड ठरू शकतं, अशी प्रतिक्रिया जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. ट्रेडास अॅडनॉम घेब्रेयेसूस यांनी व्यक्त केली आहे.
 
चाचणी केल्यानंतर रिपोर्ट्स येण्यात जो वेळ जातो, त्याचा फटका कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक देशांना बसला आहे.
 
भारत आणि मेक्सिकोसारख्या देशांमध्ये कोरोना संसर्गाचा दर अधिक आहे. या देशांमध्ये चाचण्या कमी प्रमाणात होत असल्याने संसर्गाचं खरं प्रमाण लक्षात येत नसल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातंय.
 
ही नवीन, पोर्टेबल आणि करायला अतिशय सोप्या अशा या चाचणीचा रिपोर्ट 15 ते 30 मिनिटांत येईल, ज्यासाठी आधी तासन् तास किंवा काही दिवस वाट पहावी लागायची असं प्रतिक्रिया जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. ट्रेडास अॅडनॉम घेब्रेयेसूस यांनी सोमवारी (28 सप्टेंबर) पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलं.
 
अबॉट आणि एसडी बायोसेन्सर या औषध उत्पादक कंपन्या बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सहकार्याने 120 दशलक्ष टेस्ट करण्यासाठी तयार असल्याची माहितीही घेब्रेयेसूस यांनी दिली.
 
या चाचण्या 133 देशांमध्ये घेतल्या जातील. या देशांमध्ये प्रामुख्याने लॅटिन अमेरिकन देशांचा समावेश आहे. या देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून इथे संसर्गाचा दर तसंच मृत्यूदर अन्य देशांच्या तुलनेत जास्त आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख