Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाः ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत भारत सरकारने काय सल्ला दिला आहे?

कोरोनाः ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत भारत सरकारने काय सल्ला दिला आहे?
, सोमवार, 13 डिसेंबर 2021 (19:00 IST)
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनबाबत सर्वत्र प्रश्न विचारले जात असताना, भारत सरकारनं नागरिकांना सल्ला देणारं पत्रक जारी केलं आहे. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं हे पत्रक जारी केलं आहे.
आरोग्य मंत्रालयानं हेही म्हटलंय की, भारतात लसीकरणाची आकडेवारी आणि डेल्टा व्हेरियंटच्या दरम्यान लोकांमध्ये तयार झालेली इम्युनिटी पाहता, असं मानलं जात आहे की, ओमिक्रॉन गंभीर रूप धारण करण्याची शक्यता फार कमी आहे.
ओमिक्रॉनमुळे लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. त्यातली सर्वात मोठी शंका म्हणजे, ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येईल का? भारत सरकारनं म्हटलंय की, ओमिक्रॉन भारतासह इतर देशात पसरू शकतं.
आरोग्य मंत्रालयानं असंही म्हटलंय की, आतापर्यंत हे स्पष्ट नाही की, व्हेरियंट किती प्रमाणात पसरेल आणि त्याचा धोका किती असेल.
त्यांनी म्हटलंय की, असं मानलं जातंय की, ओमिक्रॉनच्या आजाराचा धोका कमी असेल. मात्र, शास्त्रज्ञ अजूनही ओमिक्रॉनबाबत आणखी पुरावे गोळा करत आहेत.
ओमिक्रॉनचं गांभिर्य लक्षात घेऊन भारत सरकारनं लोकांना लसीकरणासाठी आवाहन केलंय.
सरकारने म्हटलंय की, डेल्टा व्हेरियंटनंतर लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती आणि लसीकरणाकडे पाहता अंदाज लावला जाऊ शकतो की, ओमिक्रॉन आजाराचा धोका जास्त नसेल.
 
उपलब्ध असलेली लस परिणामकारक ठरेल का?
सरकराने पत्रकात म्हटलंय की, आतापर्यंत असा कोणताच पुरवा नाहीय की, ज्यातून कळू शकेल की, सध्या उपलब्ध असलेल्या लशी ओमिक्रॉनवर काम करणार नाहीत.
अधिकाधिक लोकांनी लस घ्यावी, असं आवाहान भारत सरकारनं केलंय.
 
भारतात आता सुरू असलेल्या चाचण्या कोव्हिड झालाय की नाही, हे तपासू शकतात. मात्र, ओमिक्रॉन व्हेरियंट आहे की नाही, हे तपासू शकत नाहीत. ओमिक्रॉनच्या व्हेरियंटसाठी जिनोम सिक्वेन्स टेस्टची आवश्यकता असते.
कर्नाटकातील बंगळुरूत कोव्हिडच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर भारतातील इतर राज्यांमध्ये सतर्कता बाळगली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ओमिक्रॉन आणि कोव्हिडशी संबंधित स्थितीबाबत बैठक घेतली.
त्याचवेळी, तामिळनाडूमध्ये दोन आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोरोनाची लागण झालीय. हे प्रवासी सिंगापूर आणि ब्रिटनमधून आले होते. या दोन्ही प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांवर नजर ठेवली जात आहे.
 
बूस्टर डोसचा सल्ला
पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार भारतातीतील वरिष्ठ जिनोमतज्ज्ञांनी चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना कोव्हिड लशीचा बूस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला आहे.
भारत सरकारने सीर्स-सीओव्ही-2 जिनोम सिक्वेन्सिंग लॅबचे एक नेटवर्क उभे केले आहे त्यामुळे कोरोनाच्या वेगवेगळ्य़ा व्हेरिएंट्सवर लक्ष ठेवता येईल. या नेटवर्कच्या कन्सोर्टियमने सरकारला, कोरोनाचा धोका आणि लोकसंख्येचा विचार करुन 40 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्या सल्ला दिला आहे.
 
जगात इतरत्र ओमिक्रॉनची काय स्थिती आहे?
युरोपातली सर्वात मोठी अर्थ व्यवस्था असलेल्या जर्मनीने लस न घेतलेल्या लोकांना अत्यावश्यक सेवांशिवाय इतर कोणतंही काम करता येणार नाही असं स्पष्ट केलय. जर्मनीमध्ये लसीकरण अनिवार्य करण्यासाठी कायदाही होणार आहे.
विविधं सरकारं आपल्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल असले तरी अशा सीमा बंद केल्यामुळे फक्त वेळ मिळेल असं डब्ल्यूएचओ सांगत आहे.
डब्ल्यूएचओचे पश्चिम पॅसिफिक भागाचे प्रदेश संचालक ताकेशी कासाई सांगतात, फक्त सीमा बंद करण्यावर आपण भर देता कामा नये. या व्हेरिएंटशी लढण्याची तयारी केली पाहिजे. आतापर्यंतच्या माहितीनुसार आपल्याला आपली पद्धत बदलण्याची गरज नाही."
ओमिक्रॉनचे रुग्ण आढळू लागल्यामुळे जगभरातील देश प्रवाश्यांवर बंदी घालत आहेत.  हाँगकाँग, नेदरलँड्स, रशिया यांनी नियम कडक केले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Omicron : कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट किती भयंकर?