Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना लशीमुळे शरीर चुंबक झाल्याचा दावा किती खरा?

Webdunia
गुरूवार, 10 जून 2021 (19:18 IST)
-प्रवीण ठाकरे
कोरोना लशीबाबत विविध प्रकारच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. यामध्ये आता आणखी एका विषयाची भर पडली आहे.
 
कोरोना लस घेतल्यानंतर शरीराला नाणे आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा एका व्यक्तीने केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे. लस घेतल्यामुळे हे झालेलं नसावं, तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार असल्याचं नाशिकच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी म्हटलं आहे.
 
अरविंद सोनार असं या 'मॅग्नेटमॅन'चं नाव असून ते नाशिकमधील रहिवासी आहेत. आपल्या शरीराला नाणी चिकटत असल्याचा व्हीडिओ त्यांनी शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे.
 
दुसरा डोस घेतल्यानंतर 'मॅग्नेटमॅन' बनल्याचा दावा
 
नाशिकमधील शिवाजी चौक येथे राहणारे अरविंद सोनार यांनी 4-5 दिवसांपूर्वी लशीचा दुसरा डोस खासगी रुग्णालयात घेतला होता.
 
अरविंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ते आणि त्यांचे चिरंजीव असेच एकमेकांशी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी मुलाने त्यांना लशीबाबत एक बातमी दाखवली. कोरोना लस घेतल्यावर स्टील शरीराला चिकटते, असा या बातमीचा आशय होता. त्यानंतर आपणही तो प्रयोग करून पाहू, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यावेळी खरंच स्टीलच्या वस्तू त्यांना चिकटू लागल्याने त्यांना आश्चर्य वाटलं."
 
सोनार यांची तब्येत ठणठणीत असून दोन्ही डोस घेतल्यानंतर त्यांना काहीही त्रास झालेला नाही, असं त्यांनी सांगितलं.
 
अरविंद सोनार यांनी कोव्हिशिल्ड लशीचा पहिला डोस 9 मार्च रोजी घेतला होता. त्यानंतर 2 जूनला त्यांनी दुसरा डोस घेतला.
 
त्यांची दहा वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे. शिवाय त्यांना गेल्या दोन वर्षांपासून मधुमेहाचा त्रास असून त्यावर औषधोपचार सुरू आहेत. अरविंद यांना स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचं निदर्शनास येताच त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना याबाबत माहिती दिली. याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
 
'प्रकरणाची चौकशी करणार'
 
या घटनेचं कारण जाणून घेण्यासाठी बीबीसीने नाशिकचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशी चर्चा केली.
 
या घटनेची माहिती आपल्याला माध्यमांमधूनच मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
 
"या प्रकरणी तज्ज्ञ पाठवून त्यासंबंधी एक अहवाल शासनास पाठवणार आहे. त्यानंतर शासन निर्देशानुसार कार्यवाही होईल," असं ते म्हणाले.
 
शिवाय, "लशीमुळे असं काही होईल, हा दावाही त्यांनी फेटाळून लावला."
 
त्यांच्या मते, हा प्रकार नेमकं काय याची सखोल माहिती घेणं आवश्यक आहे. हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे.
 
माझ्या संपूर्ण वैद्यकीय कारकिर्दीत आपण पहिल्यांदाच अशी घटना पाहतोय, अशी प्रतिक्रिया डॉ. थोरात यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments